घरमुंबईकोस्टल रोडच्या खड्ड्यात बुडून १२ वर्षांच्या मुलाचा मृत्यू

कोस्टल रोडच्या खड्ड्यात बुडून १२ वर्षांच्या मुलाचा मृत्यू

Subscribe

वरळी सी लिंकजवळच्या कोस्टल रोडसाठी खणलेल्या मोठ्या खड्ड्यामध्ये बुडून एका १२ वर्षांच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू ओढवल्याची घटना समोर आली आहे.

गेल्या दोन दिवसांपासून गोरेगाव परिसरातल्या नाल्यांमध्ये एनडीआरएफचे जवान चिमुकल्या दिव्यांशचा शोध घेत आहेत. मात्र तशीच एक घटना वरळी सी लिंकजवळ घडली असून यामध्ये एका १२ वर्षांच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

- Advertisement -

नक्की घडलं काय?

वरळी सी लिंकजवळ कोस्टल रोडचं सध्या काम सुरू आहे. याच कोस्टल रोडसाठी एक मोठा खड्डा या ठिकाणी खोदण्यात आला होता. रस्त्याचं बांधकाम असल्यामुळे खड्डा बऱ्यापैकी मोठा होता. पावसामुळे या खड्ड्यामध्ये भरपूर पाणी साचलं होतं आणि एखाद्या छोट्या विहिरीसारखंच स्वरूप या खड्ड्याला आलं होतं. दरम्यान, बबलू कुमार रामपुनील पासवान हा १२ वर्षांचा मुलगा या ठिकाणाहून जात असताना तोल जाऊन तो या खड्ड्यात पडला. खड्ड्यात पाणी नसतं, तर कदाचित बबलूला वाचवण्यात यश आलं असतं. मात्र, खड्ड्यात साचलेल्या पाण्यामुळे त्यात बुडून बबलूचा मृत्यू झाला.

worli sea link kid died

- Advertisement -

रुग्णालयात पोहोचायला उशीर झाला…

बबलू खड्ड्यात पडल्यानंतर आसपासच्या लोकांनी प्रयत्न करून त्याला बाहेर काढलं आणि नायर हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. मात्र, तोपर्यंत बबलूचा मृत्यू झाला होता. संध्याकाळी ५च्या सुमारास ही घटना घडली.


वाचा चिमुकल्या दिव्यांशची कथा – मुंबईत नाल्यात वाहून गेला चिमुरडा!
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -