नवाब मलिकांविरोधात वाशिम पोलीस ठाण्यात अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्याविरोधात जातीवाचक टिप्पणी केली. त्यांच्या वक्तव्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

NCP leader Nawab Malik’s son Faraz booked in cheating case over use of fake documents in visa plea

राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते आणि माजी मंत्री नवाब मलिक यांनी तत्कालीन मुंबई विभागीय संचालक समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्यासह कुटुंबियांवर नवाब मलिक यांनी जातीवाचक टिप्पणी केल्याबद्दल वाशिम न्यायालयाने त्यांच्याविरोधात ‘अ‍ॅट्रॉसिटी’ (atrocity)अंतर्गत गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. वाशिम (Washim Police Station) पोलीस ठाण्यामध्ये नवाब मलिक यांच्याविरोधात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

वानखेडेंच्या चुलत भावाच्या तक्रारीवरुन गुन्ह्याची नोंद
समीर वानखेडे यांचे चुलत भाऊ संजय वानखेडे यांनी वाशिम न्यायालयात या प्रकरणी याचिका दाखल केली होती. पण समीर वानखेडे यांनी स्वतः प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले होते. त्यानंतर समीर वानखेडे यांनी 24 ऑगस्ट रोजी स्वतः वाशिम न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केले होते. त्यावर 15 नोव्हेंबर रोजी सुनावणीसुद्धा झाली. यावेळी न्यायालयाने नवाब मलिकांविरोधात अनुसूचित जाती आणि जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम, 1989 यान्वये गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानुसार समीर वानखडे यांचे बंधू संजय वानखडे यांच्या फिर्यादीवरुन काल 16 नोव्हेंबर रोजी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला, अशी माहिती वाशिम शहर पोलीस ठाण्याचे ठाणेदार रऊफ शेख यांनी दिली.

नवाब मलिकांची वानखेडेविरोधात टिप्पणी
समीर वानखेडे (sameer wankhede) हे एनसीबीचे अधिकारी असताना त्यांनी बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला अंमली पदार्थ प्रकरणी अटक केली होती. त्यानंतर समीर वानखेडे यांनी केलेली कारवाई बोगस असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी केला होता. मलिक यांनी वानखेडे यांच्याविरोधात विरोधात अनेक आरोप सादर करत त्यांच्या कारवाईवर प्रश्न उपस्थित केले होते. नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्याविरोधात जातीवाचक टिप्पणी केली. त्यांच्या वक्तव्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर संजय वानखेडे यांनी पोलिसात गुन्हा दाखल केला. पाण पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला नाही. यानंतर त्यांनी कोर्टात धाव घेतली. या प्रकरणी नवाब मलिक यांच्याविरोधात अॅट्रॉसिटीचा गुन्हा नोंदवण्याचे आदेश न्यायालयाने दिले.

मलिक सध्या ईडी कोठडीत
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाकडून म्हणजेच ईडी कडून नवाब मलिक यांना 23 फेब्रुवारी 2022 रोजी अटक करण्यात आली होती. सध्या ते ईडी कोठडीत आहेत. त्यामुळे आधीच ईडी कोठडीत असलेले नवाब मलिका यांची सुटका झाली तरीही समीर वानखेडे प्रकरणी मलिकांना अद्याप दिलासा नाही.


हे ही वाचा – हम सब एक है; सर्वच पक्षातील बडे नेते जामीनावर अन् राजकारणात सक्रिय!