घरनवी मुंबईवासिंदजवळ प्लास्टिक कारखान्याला भीषण आग

वासिंदजवळ प्लास्टिक कारखान्याला भीषण आग

Subscribe

वासिंद जवळील मुंबई-नाशिक महामार्गालगत असलेल्या वेहळोली गावाजवळील औद्योगिक वसाहतीत प्लास्टिकच्या गृहउपयोगी वस्तूंचे उत्पादन करणार्‍या कृष्णा प्रमोशन प्रायव्हेट लिमिटेड या कारखान्याला मंगळवारी पहाटे साडेपाच वाजताच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना येथे घडली. आगीत साडेतीन एकर जागेत असलेला हा प्लास्टिक उत्पादन करणारा कारखाना संपूर्ण जळून खाक झाला आहे.

तसेच प्लास्टिक कंपनीच्या प्लँट व गोडाऊनला आग लागताच कारखान्यातील कामगार हे प्रसंगावधान राखत कंपनीच्या गेटबाहेर पळत सुटल्याने त्यांचा जीव वाचला. या आगीच्या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे वासिंद पोलिसांनी सांगितले. दरम्यान, ही आग विजेच्या शॉर्टसर्किटने लागल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

- Advertisement -

कारखान्यात एकूण किती कामगार काम करत होते, याचा निश्चित आकडा कंपनी व्यवस्थापन व पोलिसांकडून मिळू शकलेला नाही. दरम्यान, ही आग इतकी भीषण होती की आगीच्या धुराचे लोळ मुंबई नाशिक महामार्गावर पसरले होते. यामुळे काही काळ लगत असलेल्या वेहळोलीगाव, वासिंद, आसनगाव, खातिवली या परिसरातील लोकांमध्ये भीतीचे सावट पसरले होते.

कारखान्याला लागलेल्या या आगीत कारखान्यातील लाखो रुपयांचे प्लास्टिक साहित्याचा साठा जळून खाक झाला आहे. आगीची माहिती मिळताच भिवंडी निजामपूर, कल्याण-डोंबिवली महापानगरपालिका, ठाणे महानगरपालिका नवी मुंबई महानगरपालिका येथील एकूण १० अग्निशामक दलाच्या गाड्या लागलीच घटनास्थळी दाखल झाल्या. आग विझविण्यासाठी स्थानिक ७ पाण्याचे टँकर देखील मागविण्यात आले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -