मालाडच्या कुरार व्हिलेज परिसरात आग; 50-70 झोपड्या जळून खाक

मुंबईमधील मालाड येथे असलेल्या झोपडपट्टीला मोठी आग लागल्याची बातमी समोर आली असून ही आग मलाड येथील कुरार व्हिलेड परिसरात लागलेली आहे. येथील जवळपास 50-70 झोपड्या आगीत भक्ष्यस्थानी पडल्या आहेत. अग्निशमन दलाचे 4 बंब घटनास्थळी दाखल झाले आहेत. दरम्यान, आता ही आग नियंत्रणात आली असून सुदैवाने यात कोणातीही जीवितहानी झालेली नाही.

A fire broke out in 50 to 70 shanties in Kurar Village in Malad area of Mumbai News in Marathi

मालाडमधील कुरार झोपडपट्टीचा हा परिसर दाटीवाटीचा आहे. त्यामुळे येथे आग लागल्यामुळे अग्निशमन दलाला आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागले.

बदलापुरात केमिकल कंपनीला भीषण आग
दरम्यान, यापूर्वी रविवारी सकाळी 11.22 वाजता बदलापूर एमआयडीसीतील केमिकल कंपनीला लागलेल्या भीषण आगीत ही केमिकल कंपनी जळून खाक झाली. बदलापूर पूर्वेकडील एमआयडीसीतील कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या अग्निशमन केंद्रासमोर गगनगिरी फार्मा केम प्रा.लि. ही कंपनी आहे. या कंपनीत आयपीए सॉलव्हंट हे केमिकल तयार केले जाते. अग्निशमन दलाच्या जवानांनी सकाळी 11.20 ते संध्याकाळी 4.20 पर्यंत सलग चार तास अथक प्रयत्न करून आग पूर्णपणे नियंत्रणात आणली. या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र तीन कामगार जखमी झाले.


हेही वाचा :

बदलापुरात केमिकल कंपनीला भीषण आग