घरमुंबईबेस्टकडून मुंबईकरांना भाऊबीज भेट; 'या' मार्गांवर धावणार 145 जादा बसेस

बेस्टकडून मुंबईकरांना भाऊबीज भेट; ‘या’ मार्गांवर धावणार 145 जादा बसेस

Subscribe

मुंबई : दिवाळीनिमित्त अनेकजण नातेवाईकांकडे भेटी देण्यासाठी जात असतात. धनत्रयोदशीपासून दिवाळीला सुरुवात झाल्यानंतर रविवारी लक्ष्मी पूजन आणि नरक चतुर्दशी देखील मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. आता उद्या दिवाळी पाडवा आणि त्यानंतर बुधवारी भाऊबीज साजरी होणार आहे. या दिवशी सणानिमित्तानं भाऊ-बहिण एकमेकांच्या घरी जात असतात. त्यांना प्रवास करताना गर्दीचा सामना करावा लागू नये, यासाठी बेस्टनं मोठा निर्णय घेतला आहे. बेस्ट मुंबई, उपनगरे आणि विविध महापालिका क्षेत्रात बसेसच्या तब्बल 145 जादा बसेस सोडण्यात येणार आहेत. (A gift from Best to Mumbaikars 145 additional buses will run on these routes)

हेही वाचा – कीर्तिकर-कदम पुन्हा आमनेसामने; ज्येष्ठ नेत्यांकडून विश्वासघात, देशद्रोही म्हणून उल्लेख

- Advertisement -

भाऊबीज सणानिमित्त होणारी प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन त्यांच्या सोयीसाठी मुंबई शहर, पूर्व- पश्चिम उपनगरे, वेस्टर्न एक्सप्रेस हायवे, मिरा रोड, भाईंदर, मॅरेथॉन चौक (ठाणे), कोपरी (ठाणे), कॅडबरी जंक्शन (ठाणे) तसेच वाशी, नवी मुंबई, कोपरखैराणे, नेरुळ, ऐरोली, घणसोली स्थानक, सीबीडी बेलापूर इत्यादी ठिकाणी जाणाऱ्या विविध बसमार्गांवर बेस्ट उपक्रमाच्यावतीने एकूण 145 जादा बसगाड्या सोडण्यात येत आहेत.

गर्दीच्या बसथांब्यांवर बसनिरीक्षकांची नेमणूक

भाऊबीज सणाच्या दिवशी प्रवाशांच्या आवश्यकतेनुसार बसेसच्या संख्येत वाढ करण्यात येईल, असं बेस्टनं सांगितलं आहे. बेस्टतर्फे असेही सांगण्यात आले आहे की, प्रवाशांच्या मदतीकरिता जास्त गर्दीच्या बसथांब्यांवर तसेच रेल्वे स्थानकाबाहेरील बसस्थानकांवर बसनिरीक्षकांची तसेच वाहतूक अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात येणार आहे. त्यामुळे भाऊबीजेच्या दिवशी सर्व प्रवाशांनी अतिरिक्त बसगाड्यांची नोंद घेऊन उपलब्ध केलेल्या जादा बस सेवेचा लाभ घ्यावा, असं आवाहन बेस्ट प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.

- Advertisement -

हेही वाचा – परदेशात उच्च शिक्षण घेणाऱ्या ओबीसी विद्यार्थ्यांना दिवाळीत मोठा दिलासा; वडेट्टीवारांच्या आरोपानंतर शासन निर्णय जारी

लोकल सेवेवरील ताण होणार कमी 

भाऊबीजेच्या दिवशी बेस्ट प्रशासनानं बसेसची संख्या वाढवण्याचा निर्णय घेतल्यामुळे लोकल सेवेवरील ताण कमी होणार असून इतर वाहन सुविधांसाठी प्रवाशांना अधिक पैसे देखील मोजावे लागणार नाही. तसेच प्रवाशांचा प्रतिसाद वाढल्यास बसेसची संख्या वाढवली जाऊ शकते, असे बेस्ट प्रशासनाने सांगितले आहे. त्यामुळे मुंबईकरांना भाऊबीजेच्या दिवशी प्रवास करताना येणाऱ्या अडचणी देखील कमी होतील. त्यामुळे मुंबईकरांचा प्रवास सुखकर होणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -