घरठाणेकल्याणात ‘तो मी नव्हेच’चा वास्तव प्रयोग

कल्याणात ‘तो मी नव्हेच’चा वास्तव प्रयोग

Subscribe

नाव बदलून फसवणारा लखोबा अटकेत, घटस्फोटीत, विधवांना लग्नाचे आमिष, अनेक महिलांचे दागिने घेऊन पसार,

नाटककार आचार्य अत्रे यांच्या ‘तो मी नव्हेच’ या अजरामर नाटकातील प्रभाकर पणशीकरांनी साकारलेला लखोबा लोखंडे विधवा किंवा घटस्फोटीत महिलांना लग्नाचे आमिष दाखवून त्यांची फसवणूक करून त्यांचे दागिने घेऊन पसार होत असे. त्यासाठी हा लखोबा स्वतःला निपाणीचा तंबाखूचा व्यापारी असल्याचे सांगून महिलांच्या केलेल्या फसवणूक प्रकरणी ‘तो मी नव्हेच’ बोलून कानावर हात ठेवत असे. महिलांना फसवण्यासाठी नाटकातील हा लबाड लखोबा आपली नावे बदलत असे. अशाच पद्धतीने नावे बदलून महिलांना फसवणारा आणि त्यांचे दागिने घेऊन पसार होणार्‍या एका लखोबाला कल्याण पोलिसांनी गजाआड केला आहे. त्यामुळे या लखोबाच्या फसवणुकीच्या वास्तवातील नाट्य प्रयोगावर अखेर पोलिसांकडूनच पडदा पडला आहे.

विधवा आणि कायदेशीर घटस्फोट झालेल्या महिलांना वधू-वर सूचक मंडळाच्या माध्यमातून लग्नाचे आमिष दाखवून त्यांच्याकडून सोने लाखो रुपये उकळणार्‍या ठगास डोंबिवलीच्या विष्णुनगर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत, तो विरार येथे वास्तव्यास आहे. उच्चशिक्षित असल्याचा गैरफायदा घेत शैलेश बांबर्डेकर या ठकसेनाने घटस्फोटीत, विधवा महिलांना लग्नाचे विविध आमिषे दाखवून त्यांच्याकडून दागिने घेऊन पोबारा केला होता. महिलांना फसवण्यासाठी शैलेश याने प्रथम माने असे बोगस नाव धारण केले होते.

- Advertisement -

वधू-वर सूचक मंडळात लग्नासाठी नाव दाखल केलेल्या महिलांना भावनिकरित्या आपल्या मोहपाशात ओढून शैलेश फसवत होता. लग्न करण्याचे वचन देऊन घरातील सोने घेऊन पसार होण्याचा त्याचा फंडा होता. मिळालेल्या माहितीनुसार डोंबिवलीतील विष्णुनगर पोलीस स्टेशनमध्ये 16 एप्रिल रोजी एका पीडित महिलेने वधू-वर सूचक मंडळाच्या माध्यमातून तक्रार दाखल केली होती. या महिलेचे शैलेश याने दहा तोळ्याचे सोने घेऊन तो पसार झाला होता.

सीनियर इन्स्पेक्टर संजय साबळे, पोलीस इन्स्पेक्टर खिल्लारे तसेच गुन्हे प्रकटीकरण विभागाचे पोलीस अधिकारी गणेश वडणे यांच्या पथकाने या ठगाबाबत माहिती घेतली. त्यानंतर त्याने अनेक पीडित महिलांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. विष्णुनगर पोलीस स्टेशनच्या गुन्हे प्रकटीकरण विभागाच्या पोलिसांनी शैलेश बांबर्डेकर उर्फ प्रथम माने याला पकडण्यासाठी व्यूहरचना आखली. त्यावेळी तो पोलिसांना कांदिवली येथे आढळून आल्याने त्याच्या तेथून मुसक्या आवळल्या. त्याच्याकडून पोलिसांनी लाखो रुपये तसेच 140 ग्रॅम सोने हस्तगत केले आहे. एकंदरीत तीन घटस्फोटीत आणि काही विधवा महिलांची त्याने फसवणूक केली आहे. याबाबत पोलीस अधिक तपास करीत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -