घरताज्या घडामोडीVideo: माटुंगा रोड रेल्वे पुलावर तरुणीचा विनयभंग!

Video: माटुंगा रोड रेल्वे पुलावर तरुणीचा विनयभंग!

Subscribe

मुंबई माटुंगा रोड रेल्वे पुलावरती एका आरोपीने मुलीचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून या आरोपीला रेल्वे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. २६ जानेवारीच्या दुपारी ही घटना घडली आहे. त्यामुळे मुंबईतील महिलांच्या सुरक्षितेबाबतचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. हा आरोपी व्हिडिओमध्ये एका तरुणीच्या गालावरती तिच्या मागून जाऊन किस करताना दिसत आहे. यापूर्वी देखील आरोपीने एकट्या असणाऱ्या महिलांशी आणि तरुणींशी अशाप्रकारे विनयभंग केल्याचे समोर येत आहे.

मुंबईत तरूणीचा विनयभंग, तरूणानं रेल्वेपुलावर केलं किस

मुंबईत तरूणीचा विनयभंग, तरूणानं रेल्वेपुलावर केलं किस

आपलं महानगर – My Mahanagar ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಬುಧವಾರ, ಫೆಬ್ರವರಿ 5, 2020

- Advertisement -

रेल्वे पोलिसांनी देखील यापूर्वी या आरोपीला चोरीच्या आरोपाखाली अटक केली होती. त्यामुळे त्याचे सीसीटीव्ही फुटेज तपासात असताना हा व्हिडिओ समोर आला. त्यानंतर पोलिसांना कळलं की, हा आरोपी चोरी व्यतिरिक्त महिलांचा देखील विनयभंग करत होता. ज्यावेळी माटुंगा रोड पुलावर कोणी नसतं तेव्हा हा आरोपी महिलांचा विनयभंग करत असतो. मात्र याप्रकरणी कोणतीही महिला पुढे येऊन बोलत नव्हती. त्यामुळे हा आरोपी त्याचाचं फायदा घेत होता. परंतु आता पोलिसांनी आवाहन केलं आहे की, ज्यांच्यासोबत अशाप्रकारे घडलं आहे त्या महिला आणि तरुणींनी आमच्याकडे यावं.

अत्यंत किळसवाणे प्रकार मुंबईत सुरू झालेले आहेत. रेल्वे पुलावर देखील पोलीस असणं आवश्यक आहे. तसंच ही विकृती समाजात का वाढते याचा देखील विचार करणं फार गरजेचं आहे. याशिवाय आमचं सरकार रेल्वे पोलिसांना स्पेशल ड्युटी देखील देणार आहे. तसंच लोकलमधील डब्यात असणाऱ्या पोलिसांनप्रमाणे आता रेल्वे पुलावर पोलीस असण्याची मागणी आम्ही गृहमंत्र्यांकडे करणार आहोत. – राष्ट्रवादी काँग्रेस विद्या चव्हाण

- Advertisement -

अशाप्रकारेचे हरामखोर जागोजागी दिसतील. यांच्या मुसक्या आवळणे फार गरजेच आहे. महिलांनी स्वतःची काळजी स्वतः घ्या कोणावर अवलंबून राहू नका, असं मला महिलांना आवाहन करायचं आहे. सध्या महिला आणि तरुणीवर अत्याचाराचं सत्र सुरू आहे. प्रत्येक वेळी आम्ही निवेदन देणार आणि मागणी करणार असं सांगतात. मग मागणी करण्याच्या आधी करतात काय? गोट्या खेळतात का? महिलांनो स्वतः सक्षम व्हा. – भाजप नेता चित्रा वाघ


हेही वाचा – करोनाचे ४९० बळी; मुंबईतील कस्तूरबा रूग्णालयात होतेय तपासणी!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -