घरमुंबईआमदार जितेंद्र आव्हाडांच्या माजी अंगरक्षकाच्या आत्महत्येने करमुसे प्रकरणाला नवे वळण?

आमदार जितेंद्र आव्हाडांच्या माजी अंगरक्षकाच्या आत्महत्येने करमुसे प्रकरणाला नवे वळण?

Subscribe

ठाणे : अनंत करमुसे मारहाण प्रकरणी माफीचा साक्षीदार असलेले आव्हाडांचे माजी अंगरक्षक वैभव कदम यांनी आत्महत्या केली आहे. करमुसे मारहाण प्रकरणात त्यांना अटक करण्यात आल्यानंतर माफीचा साक्षीदार होण्याची तयारी दर्शविली होती.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचे माजी अंगरक्षक पोलीस हवालदार वैभव कदम सध्या मुंबई पोलीस दलात पोलीस हवालदार म्हणून कार्यरत होते. आव्हाड मंत्री असताना ते त्यांचे अंगरक्षक होते. त्यावेळी अनंत करमुसे यांना मारहाण केल्याप्रकरणी त्यांना ठाणे पोलिसांनी अटकही केली होती. या प्रकरणात माफीचा साक्षीदार बनायची तयारी दर्शविलेल्या वैभव कदम यांनी बुधवारी सकाळी ९ च्या सुमारास निळजे ते तळोजा या रेल्वे मार्गिकेदरम्यान रेल्वेखाली येऊन आत्महत्या केली आहे. वैभव कदम यांनी आत्महत्येपूर्वी कोणतीही चिठ्ठी लिहीली नसल्यामुळे आत्महत्येचे कारण अद्यापही कळू शकले नसल्यामुळे अनंत करमुसे मारहाण प्रकरणाला नवे वळण येण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

काय आहे प्रकरण?
ठाण्यातील घोडबंदर रोड परिसरात राहणारे अभियंता अनंत करमुसे यांनी ५ एप्रिल २०२० रोजी ठाकरे सरकारमधील तत्कालीन मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात समाजमाध्यमावर आक्षेपार्ह टीप्पणी केली होती. या रागातुन आव्हाड यांचे अंगरक्षक वैभव कदम आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी करमुसे यांना घरातुन उचलुन आव्हाड यांच्या नाद बंगल्यावर घेऊन गेले. त्यावेळी त्यांनी करमुसे यांना बेदम मारहाण केली.
याप्रकरणी वर्तकनगर पोलीसांनी गुन्हा दाखल करून, आव्हाड यांच्या अंगरक्षकासह सहा कार्यकर्त्यांना अटक केली होती. यातील तिघाही पोलिसांची विभागीय चौकशी केली; मात्र, पोलिसांनी आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली होती. त्यानंतर उच्च न्यायालयाच्या बडग्याने तब्बल दीड वर्षानंतर १४ ऑक्टोबर २०२१ रोजी सायंकाळी वर्तकनगर पोलिसांनी आव्हाड यांना छोट्या प्रकरणांमध्ये अटक करून तात्काळ त्यांची जामिनावर मुक्तता केली होती.
या संपूर्ण प्रकरणाची सीबीआय चौकशी करणारी याचिका उच्च न्यायालयाने फेटाळल्यानंतर करमुसे यांनी सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली होती. त्यावर सर्वोच्च न्यायालयाने तीन महिन्यात चौकशी करुन अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. या प्रकरणात वैभव कदम याने माफीचा साक्षीदार होण्याची तयारी दर्शविली होती. महत्त्वाचे म्हणजे करमुसे प्रकरणात कदम यांचीही आरोपी म्हणून चौकशी सुरु होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -