घरCORONA UPDATECoronavirus - दुबईवरून आलेला 'तो' लपून बसलेला उरणच्या हॉटेलमध्ये

Coronavirus – दुबईवरून आलेला ‘तो’ लपून बसलेला उरणच्या हॉटेलमध्ये

Subscribe

ब्रेन डॉग्लास स्तील या दुबई येथून आलेल्या एका कॅनडा येथील संशयास्पद रुग्णास ताब्यात घेऊन त्याला आज उरण येथील विलागीकराणात दाखल करण्यात आले आहे.

ही व्यक्ती ओएनजीसी येथे कंत्राटी काम घेत असल्याचे सांगण्यात येते. १२ तारखेला दुबईतून सादर व्यक्ती मुंबईत वास्तव्याला होती.  २२ तारखेपासून ती उरण येथील हॉटेल प्लाझा या हॉटेलवर राहायला होती. नागाव ग्रामपंचायतीचे सरपंच मोहन काठे आणि ग्रामसेवक किरण केणी यांना माहिती मिळताच त्यांनी या संबंधीची माहिती उरणच्या तहसीलदार आणि पोलिसांना दिली. संबंधितांनी उरण प्लाजा हॉटेलवर छापा टाकला आणि त्या व्यक्तीला ताब्यात घेतले.

- Advertisement -

मात्र हॉटेलच्या व्यवस्थापकांनी त्यांना ताब्यात देण्यास नकार देताच पोलिसांनी त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचा इशारा दिल्यावर या व्यक्तीला पोलिसांच्या ताब्यात दिले. सदर व्यक्तीला उरणच्या केअर पॉइंट या इस्पितळात विलगीकरण कक्षात  ठेवण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -