घरCORONA UPDATEधक्कादायक : कोरोनाग्रस्त गर्भवती महिला रुग्णवाहिकेसाठी सहा तास प्रतीक्षेत

धक्कादायक : कोरोनाग्रस्त गर्भवती महिला रुग्णवाहिकेसाठी सहा तास प्रतीक्षेत

Subscribe

मनसे कार्यकर्त्यांनी प्रशासनावर दबाव टाकल्यानंतर या महिलेला रुग्णवाहिका मिळाली.

कोरोनाग्रस्त गर्भवती महिलेला रुग्णवाहिकेसाठी तब्बल ६ तास प्रतीक्षा करावी लागल्याची घटना  रविवारी डोंबिवलीत घडली आहे. मनसे कार्यकर्त्यांनी प्रशासनावर दबाव टाकल्यानंतर या महिलेला रुग्णवाहिका मिळाली. कोरोनाबाधित रुग्णाला रुग्णवाहिका न मिळाल्याने त्याला रुग्णालयात चालत जाण्याचा प्रकार घडला होता. पुन्हा हा प्रकार घडल्याने डोंबिवलीकरांमध्ये संताप व्यक्त होत आहे.

डोंबिवलीत राहणाऱ्या या महिलेची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर महिलेच्या पतीने केडीएमसीच्या शास्त्रीनगर कोविड रुग्णालयात रुग्णवाहिकेसाठी फोन केला. मात्र, आमच्याकडे रुग्णवाहिका नसून तुम्ही ठाणे सिव्हिल रुग्णालयामध्ये जा, असा सल्ला या महिलेला रुग्णालय प्रशासनाने दिला. त्यानंतर तब्बल ६ तास या महिलेनं रुग्णवाहिकेची वाट पाहिली. अखेर मनसे कार्यकर्त्यांना हा प्रकार समजल्यानंतर त्यांनी फोनाफोनी करून प्रशासनावर दबाव टाकला आणि महिलेला घ्यायला रुग्णवाहिका आली. यानंतर मनसे कार्यकर्ते ओम लोके आणि सागर मुळे हे दोघे या महिलेला ठाणे सिव्हिल रुग्णालयापर्यंत सोडून आले.

- Advertisement -

दोनच दिवसांपूर्वी डोंबिवलीत रुग्णवाहिका उपलब्ध नसल्यानं कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाने दोन किलोमीटर पायपीट करत रुग्णालय गाठलं होतं. तर शनिवारी कल्याणमध्ये एका ७० वर्षांच्या आजोबांना ४ मजले सरपटत उतरावे लागले होते, आणि रुग्णवाहिका चालक उपवास सोडायचं कारण देत निघून गेला होता. यानंतर समोर आलेली ही तिसरी घटना असून या सगळ्याला केडीएमसीचा भोंगळ कारभार कारणीभूत असल्याचा आरोप केला जातोय.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -