घाटकोपरच्या पंतनगरमध्ये एका इमारतीची संरक्षक भिंत कोसळली

घाटकोपरमध्ये एका इमारतीची संरक्षक भिंत निर्माणाधीन इमारतीच्या परिसरात कोसळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. घाटकोपरच्या पंतनगर परिसरात ही घटना घडली.

घाटकोपरमध्ये एका इमारतीची संरक्षक भिंत निर्माणाधीन इमारतीच्या परिसरात कोसळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. घाटकोपरच्या पंतनगर परिसरात ही घटना घडली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र संरक्षक भिंत कोसळ्याने या ठिकाणी मोठा खड्डा निर्माण झाला आहे. (A protective wall of a building collapsed in Pantnagar of Ghatkopar)

मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळच्या सुमारास ही घटना घडल्याचे समजते. घाटकोपरच्या पंतनगर परिसरात असलेल्या इमारतीची संरक्षक भिंत कोसळली. कोसळलेला भाग हा संबंधीत इमारतीच्या पार्किंगचा भाग असल्याचे समजते. दरम्यान, या दुर्घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी स्थानिक पोलीसांनी धाव घेतली. तसेच, अग्निशमन दलाच्या जवानांनी धाव घेत नेमकी संरक्षक भिंत कशामुळे कोसळली याचा तपास करत आहेत.

सदर रहिवाशी इमारतीच्या पायाला निर्माण झालेला धोका पाहता पोलिसांनी रहिवाशांना इमारतीबाहेर काढून इमारत खाली केली आहे. त्यामुळे सदर धोका संभावलेल्या इमारतीमधील रहिवाशांनी या घटनेला जबाबदार बिल्डरवर कारवाईची मागणी केली आहे.

घाटकोपरमध्ये सध्या जुन्या व धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासाचे काम जोमाने सुरू आहे. घाटकोपर ( पूर्व), पंतनगर भागातील म्हाडा वसाहतीमधील बिल्डिंग क्रमांक ४३ या जुन्या इमारतीच्या पुनर्विकासाचे काम सुरू आहे. त्यासाठी बिल्डरने इमारत उभारणीसाठी सर्वप्रथम इमारतीचा पाया मजबूत करण्यासाठी अंदाजे २० – २५ फूट खोल पाया खिडकाम केले. मात्र खोदकाम करताना शेजारील इमारत क्रमांक ४२ असलेल्या राजश्री ऑर्चिड या इमारतीच्या संरक्षक भिंतीकडील भागात पाया कोसळू नये म्हणून पायलिंगचे काम करणे आवश्यक असताना ते केले नाही.

इमारतीच्या खोल पायासाठी खोदकाम केल्याने आणि पायलिंग न केल्याने राजश्री या इमारतीचा पाया खचला व त्यामुळे सदर इमारती संरक्षक भिंत व पार्किंगची जागा असलेला भाग शनिवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास अचानकपणे कोसळला. सुदैवाने यावेळी घटनास्थळी कोणीही व्यक्ती अथवा वाहन नव्हते.

अन्यथा अनर्थ ओढवला असता. त्याहीपेक्षा भयंकर बाब म्हणजे केवळ संरक्षक भिंत व पार्किंगची जागा कोसळली जर इमारतीचा पाया कोसळला असता तर राहती इमारत रहिवाशांसह कोसळली असती तर मोठी जीवित व वित्तीय हानी झाली असती.


हेही वाचा – …तर, हिंदू गप्प बसणार नाही, भाजपा आमदार नितेश राणेंचा इशारा