घरमुंबईमुंबई उपनगरातही उभारले मदत कक्ष

मुंबई उपनगरातही उभारले मदत कक्ष

Subscribe

राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या आपत्कालीन परिस्थितीसाठी मुंबई उपनगर जिल्ह्यात आपत्ती मदत कक्ष स्थापन करण्यात आला आहे.

राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या आपत्कालीन परिस्थितीसाठी मुंबई उपनगर जिल्ह्यात आपत्ती मदत कक्ष स्थापन करण्यात आला असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद बोरिकर यांनी दिली आहे. ३ ऑगस्ट २०१९ पासून सुरु असलेल्या अतिवृष्टीमुळे राज्यात अनेक ठिकाणी विशेषत: सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात पुरपरिस्थिती निर्माण झाली आहे. या ठिकाणच्या बाधित लोकांचे स्थलांतर अन्य ठिकाणी करण्यात आले आहे. पुरग्रस्तांसाठी इच्छुक देणगीदार तसेच मदत करू इच्छिणाऱ्या व्यक्ती, संस्था, संघटना यांच्याकडून खाद्य पदार्थ, कपडे तसेच इतर साहित्य, प्रथमोपचार साहित्य, औषधे व इतर आवश्यक साहित्य स्वीकारण्याकरता मुंबई उपनगर जिल्ह्यात नैसर्गिक आपत्ती मदत कक्ष स्थापन करण्यात आले आहेत.

या ठिकाणी तुम्हाला मदत जमा करता येईल

  1. जिल्हाधिकारी कार्यालय, मुंबई उपनगर प्रशासकीय इमारत, १० वा मजला, शासकीय वसाहत, बांद्रा (पूर्व), मुंबई- ४०००५१. ०२२-२६५५६७९९
  2. उपविभागीय अधिकारी, मुंबई पूर्व उपनगर निळकंठ बिझनेस पार्क, ए-विंग, तळ मजला, किरोळ रोड, विद्याविहार (प.), मुंबई- ४०००८६. ०२२-२५११११२६
  3. तहसिलदार, अंधेरी डी. एन. रोड, भवन्स कॉलेज जवळ, अधेरी (प.), मुंबई- ४०००५८. ०२२-२६२३१३६८
  4. तहसिलदार, बोरीवली डॉ.न.रा.करोडे मार्ग, नाटकवाला लेन, एस.व्ही.रोड, बोरीवली (प.), मुंबई- ४०००९२. ०२२-२८०७५०३४
  5. तहसिलदार, कुर्ला टोपीवाला कॉलेज इमारत, १ ला मजला, सरोजिनी नायडू रोड, मुलुंड (प.), मुंबई- ४०००८०. ०२२-२५६०२३८६
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -