घरगणेशोत्सव २०१९परळच्या गणेशोत्सव मंडळाने उभारली चांद्रयान २ ची प्रतिकृती

परळच्या गणेशोत्सव मंडळाने उभारली चांद्रयान २ ची प्रतिकृती

Subscribe

परळ गिरणगावातील महादेवाची वाडी ते वागेश्र्वरी सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ ७४ वे वर्ष साजरे करत आहे. यंदाच्या वर्षी चांद्रयान २ या भारत देशाच्या यशस्वी इस्रोच्या मोहिमेचे अभिनंदन करणारे सजावट साकारले आहे. यामध्ये ४ चलचित्रांद्वारे संपूर्ण सजावट करण्यात आली आहे. त्यात अवकाशात झेपावणारे चांद्रयान, पृथ्वी आणि नंतर चंद्रभोवती फिरणारे ऑर्बिटर, लँडर आणि रोव्हर असे सर्व काही चलचित्राद्वारे मांडण्यात आले आहे. त्यामुळे बच्चे कंपनी चांद्रयानाचा अनुभव घेत आहेत. शिवाय इस्रोची सुरुवातीपासून आत्तापर्यंतचा प्रवास, चंद्रावरील इतर मोहिमा याचेही दर्शन होते. चांद्रयान आणि अवकाश मोहिमेतील सर्व महान थोर व्यक्तींचा उल्लेखही करण्यात आला आहे.

- Advertisement -

आज, शनिवारी या मोहिमेचा महत्त्वाचा टप्पा पार पडला. अवघ्या काही अंतरावर विक्रम लँडरचा इस्त्रोशी संपर्क तुटल्यामुळे भारतीयांची घोर निराशा झाली. मात्र पुन्हा एकदा चंद्रावर जाण्याच्या आशा काही मावळल्या नाहीत. इस्त्रोमधून या सोहळ्याचे दर्शन करता आले नसले तरी परळच्या गिरणगावातील महादेवाची वाडी ते वागेश्र्वरी सार्वजनिक गणेश उत्सव मंडळातर्फे याची प्रतिकृती साकारून त्याचा अनुभव देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या प्रतिकृतीची संकल्पना, सजावट अरविंद पड्याळ, तुषार हेलोंढे आणि मंडळाचे कार्यकर्ते यांची असून मंडळाला यापूर्वी सामाजिक देखाव्याची निर्मिती म्हणून अनेक पुरस्कार तसेच प्रशस्तीपत्रके देऊन गौरविण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -