माहीम समुद्र किनारी सुटकेसमध्ये सापडले पुरुषाचे अवयव

a suitcase with chopped body parts has been found in a suitcase at a beach in Mumbai
माहीम समुद्र किनारी सुटकेसमध्ये सापडले पुरुषाचे अवयव

माहीम समुद्र किनारी सोमवारी संध्याकाळी एका सुटकेसमध्ये पुरुषाच्या शरीराचे तुकडे आढळून आले. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. सोमवारी संध्याकाळी साडे सहा वाजेच्या सुमारास माहीम येथील मगदूम शहा बाबा दर्गाच्या पाठिमागे समुद्र किनारी पुरुषाच्या अवयवांनी भरलेली ही सुटकेस आढळली. दरम्यान, कुणाची हत्या करुन शरीराचे तुकडे करुन समुद्रात फेकले गेले, याबाबत अजून माहिती मिळाली नसल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. याप्रकरणी मोहीम पोलीस तपास करत आहेत.

काय आहे प्रकरण?

सोमवारी संध्याकाळी माहीम समुद्र किनारी दर्ग्यामागे एक सूटकेस तरंगताना काही लोकांनी पाहिली. ही सूटकेस उघडीच होती. यामध्ये पुरुषाचा डावा हात आणि उजवा पाय दिसत होता. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. प्रत्यक्षदर्शींनी तातडीने पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थली तातडीने धाव घेतली आणि ते घटनास्थळी दाखल झाले. समुद्रातून ती सूटकेस बाहेर काढल्यावर त्या सूटकेसमध्ये मानवी शरीराचा खांद्यापासून कापलेला डावा हात आणि गुडघ्यापासून खाली कापलेल्या अवस्थेतील उजवा पाय पंज्यासह आणि काळ्या प्लास्टिकच्या पिशवीत पुरुषाचे कापलेले गुंप्तांग आढळले. पोलिसांनी तातडीने सर्व शरीराचे अवयव सायन हॉस्पिटलमध्ये पाठवले.

माहीम पोलिसांचा तपास सुरु

‘मृताची ओळख पटण्यासाठी आम्ही हरवलेल्या लोकांची यादी काढली आहे. सूटकेस नेमकी कुठल्या ठिकाणावरुन फेकण्यात आली त्याचा शोध आम्ही घेत आहोत. याशिवाय समुद्रात आम्ही मृताचे इतर अवयव शोधण्याचा प्रयत्न करत आहोत’, अशी माहिती माहिली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मिलिंद गडनकुश यांनी दिली.