घरमुंबई'सिद्धिविनायक' अध्यक्षपद सोडल्यानंतर आदेश बांदेकरांची भावनिक पोस्ट; म्हणाले, तो दिवस कधीही...

‘सिद्धिविनायक’ अध्यक्षपद सोडल्यानंतर आदेश बांदेकरांची भावनिक पोस्ट; म्हणाले, तो दिवस कधीही…

Subscribe

आदेश बांदेकर यांनी श्री सिद्दिविनायक गणपती मंदिर न्यास व्यवस्थापन समितीचे अध्यक्षपद सोडल्यानंतर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी इन्स्टाग्रामवर एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे.

मुंबई: महाराष्ट्राचे लाडके भावोजी म्हणून घराघरात पोहोचलेले शिवसेना नेते म्हणजे आदेश बांदेकर. या आदेश बांदेकरांनी मुंबईतील प्रभादेवी येथील श्री सिद्दिविनायक गणपती मंदिर न्यास व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदाची धुरा गेली सहा वर्षे सांभाळली होती. आता त्यांचा कार्यकाळ संपल्याने अध्यक्षपदी सदा सरवणकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

आदेश बांदेकर यांनी श्री सिद्दिविनायक गणपती मंदिर न्यास व्यवस्थापन समितीचे अध्यक्षपद सोडल्यानंतर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी इन्स्टाग्रामवर एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. (Aadesh Bandekar s emotional post after Siddhivinayak trust Nyas resigns as president Said that day never)

- Advertisement -

तो दिवस कधीही विसरणार नाही

आदेश बांदेकर यांनी इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करत म्हटलं की, २४ जुलै २०१७ रोजी कोट्यावधी भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या ‘श्री सिद्धिविनायक मंदिर’ न्यासाचा अध्यक्ष म्हणून सेवा करण्याचा आशीर्वाद मला मिळाला आणि तिथून २३ जुलै २०२३ पर्यंतची ६ वर्षं अविस्मरणीय गेली. न्यासाच्या माध्यमातून, विश्वस्त मंडळाच्या सहकार्यातून अनेक चांगली कामं आणि भाविकांची सेवा करता आली. श्री सिद्धिविनायकाचा महिमा प्रत्यक्ष अनुभवता आला. पण ह्या साऱ्यातला सर्वोच्च आनंदाचा क्षण होता, सिद्धिविनायक मंदिर न्यासाचे १२९ अस्थायी कर्मचारी जे अनेक वर्ष अल्प मानधनात काम करत होते, त्यांची नोकरी कायम व्हावी ह्यासाठी पाठपुरावा करून त्यांना सेवेत कायम करण्याचा! २०१९ सालच्या अंगारक चतुर्थीचा तो दिवस मी कधीही विसरू शकत नाही… हे काम मी केले नाही, श्री सिद्धिविनायकांनी करुन घेतले. अशी पोस्ट त्यांनी केली आहे.

या पोस्टसह त्यांनी व्हिडीओही पोस्ट केला आहे. या व्हिडीओत सिद्धिविनायक मंदिर न्यासाच्या कर्मचाऱ्यांनी आदेश बांदेकर यांना वाजतगाजत निरोप दिला. तसंच त्यांना खांद्यावर उचलूनही त्यांचं कौतुक केलं. यावेळी आदेश बांदेकर भावूक झाल्याचंही या व्हिडीओत दिसत आहे.

- Advertisement -

(हेही वाचा: माझं पहिलं प्रेम देवेंद्र फडणवीस’ म्हणणारा माणूस कुणाचा? सुषमा अंधारेंचा थेट सवाल )

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -