घरमुंबईमुंबईकर सर्वात विसरभोळे; Uber Cab मध्येच आधार कार्डपासून केकपर्यंत 'या' गोष्टी विसरण्यात...

मुंबईकर सर्वात विसरभोळे; Uber Cab मध्येच आधार कार्डपासून केकपर्यंत ‘या’ गोष्टी विसरण्यात अव्वल; रिपोर्ट

Subscribe

उबरने एका निवेदनात म्हटले आहे की, "मुंबईने सलग दुसऱ्यांदा देशातील सर्वात विसराळू शहराचा किताब पटकावला आहे

मुंबईकरांचे जीवन हे घड्याळ्याच्या काट्यावर धावणारे आहे. या मुंबईकरांना सतत धावपळ करण्याची जणू सवयचं झाली आहे. मात्र या धावपळीत मुंबईकर आपल्याजवळील अनेक वस्तू उबर कॅबमध्ये प्रवास करताना विसरून जात असल्याचा अहवाल समोर आला आहे. या वस्तूंमध्ये आधार कार्ड, 5 किलोचा डंबेल, कॉलेजचे प्रमाणपत्र आणि वाढदिवसाचा केक आदीचा समावेश आहे. ही माहिती उबर या अॅपवर आधारित कॅब सेवा (Uber cabs)  कंपनीच्या अहवालातून समोर आली आहे. या अहवालानुसार, मुंबई हे भारतातील सर्वात विसराळू शहर आहे. यात गेल्या वर्षभरात फोन, स्पीकर/हेडफोन, पर्स आणि बॅग्स या वस्तू Uber कॅबमध्ये विसरलेल्या वस्तूंच्या यादीत अव्वल स्थानावर आहेत. तर इतर वस्तूंमध्ये किराणा सामान, थर्मास, पाण्याची बॉटल आणि फोन चार्जरचा समावेश आहे. (Mumbai most forgetful city)

‘या’ वस्तू विसरण्यात भारतीय अव्वल 

उबेरने प्रसिद्ध केलेल्या ‘लॉस्ट अँड फाउंड इंडेक्स’च्या 2022 च्या अहवालानुसार, “सामान्य गोष्टी विसरण्याव्यतिरिक्त, लोक घेवर (गुजरातची प्रसिद्ध मिठाई), बांसुरी, आधार कार्ड, डंबेल, बाइक हँडल, क्रिकेट बॅट, स्पाइक गार्ड आणि कॉलेजचे प्रमाणपत्रासहीत अनेक वस्तू कॅबमध्ये विसरत आहेत.

- Advertisement -

उबरने एका निवेदनात म्हटले आहे की, “मुंबईने सलग दुसऱ्यांदा देशातील सर्वात विसराळू शहराचा किताब पटकावला आहे. त्याच वेळी दिल्ली-एनसीआर आणि लखनौ ही शहरे विसरण्यात आघाडीवर आहेत. यात सर्वाधिक भारतीय त्यांच्या बहुतेक वस्तू कॅबमध्ये दुपारी 1 ते 3 दरम्यान विसरून जात आहेत.

उबेर इंडियाचे सेंट्रल ऑपरेशन्सचे संचालक नितीश भूषण म्हणाले की, “आम्ही समजू शकतो की आपली एखादी वस्तू हरवणे कोणासाठीही तणावपूर्ण असू शकते, परंतु मात्र उबेरमध्ये प्रवास करताना तुमची एखादी वस्तू हरवली तर, तुमच्याकडे ती शोधण्याचा पर्याय नेहमीच असतो.


धक्कादायक! मोबाईलवर गेम न खेळू दिल्याने मुलानेच केली आईची हत्या


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -