घरताज्या घडामोडीबाळासाहेब ठाकरे स्मारक समितीचे अध्यक्षपद आदित्य ठाकरेंकडे!

बाळासाहेब ठाकरे स्मारक समितीचे अध्यक्षपद आदित्य ठाकरेंकडे!

Subscribe

बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारक समितीच्या अध्यक्षपदी उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिल्यानंतर आदित्य ठाकरेंनी नियुक्ती करण्यात आली आहे.

मुंबईतील शिवाजी पार्क येथे होणार्‍या बाळासाहेब ठाकरे स्मारकाच्या स्मारक समितीच्या अध्यक्षपदी युवा सेना अध्यक्ष आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांची निवड करण्यात आली आहे. आदित्य ठाकरे यांच्यासह इतरही सदस्यांच्या नेमणुका यावेळी जाहीर करण्यात आल्या आहेत. पाच वर्षांसाठी ही नियुक्ती करण्यात आली असून त्यासंदर्भातील शासन निर्णय नुकताच जाहीर करण्यात आला आहे.

उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिल्यानंतर…

मुंबईतील शिवाजी पार्क येथे असणार्‍या महापौर बंगल्याजवळ लवकरच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक होणार आहे. यासाठी काही दिवसांपूर्वी २७ सप्टेंबर २०१६ रोजी शासकीय सार्वजनिक न्यासाची घोषणा करण्यात आली होती. या न्यासाचे अध्यक्षपद शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सोपवण्यात आले होते. मात्र, उद्धव ठाकरे यांनी नुकतीच राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांनी या पदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे न्यासाचे अध्यक्षपद रिक्त झाले होते. अखेर या न्यासावर पर्यटनमंत्री आणि युवा सेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांची नेमणूक करण्यात आली आहे. एकूण ११ जणांची समिती यावेळी जाहीर करण्यात आली असून चार पदे रिक्त ठेवण्यात आली असून लवकरच त्यांची घोषणा केली जाणार असल्याची माहिती कळते.

- Advertisement -

पालिका आयुक्त देखील पदसिद्ध

आदित्य ठाकरे अध्यक्ष असलेल्या या समितीत सदस्य सचिव म्हणून मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांची नेमणूक करण्यात आली आहे. तर शशिकांत प्रभू यांची नियुक्त सदस्य म्हणून करण्यात आली आहे. त्याशिवाय पदसिद्ध सदस्य म्हणून राज्याच्या मुख्य सचिवांची नेमणूक करण्यात आली आहे. तर नगरविकास आणि विधी व न्याय विभागाचे प्रधान सचिव यांना देखील पदसिद्ध म्हणून नेमण्यात आले आहे. तर मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांना देखील पदसिद्ध सदस्याची जबाबदारी देण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -