घरताज्या घडामोडी'ये डर अच्छा है...', आदित्य ठाकरेंचा शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल

‘ये डर अच्छा है…’, आदित्य ठाकरेंचा शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल

Subscribe

'शिवसेना जनतेच्या हृदयात आहे. ते यात बदल करू शकत नाही. सामान्य शिवसैनिकांना हे गद्दार सरकार घाबरते. ही आपली ताकद आहे. त्यांच्या मनात भिती असल्याने ते यंत्रणांचा गैरवापर करत आहेत. ये डर अच्छा है', अशा शब्दांत ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला.

‘शिवसेना जनतेच्या हृदयात आहे. ते यात बदल करू शकत नाही. सामान्य शिवसैनिकांना हे गद्दार सरकार घाबरते. ही आपली ताकद आहे. त्यांच्या मनात भिती असल्याने ते यंत्रणांचा गैरवापर करत आहेत. ये डर अच्छा है’, अशा शब्दांत ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला. ‘मुंबईला दिल्लीसमोर झुकवण्याचा गद्दारांचा प्रयत्न आहे’, असेही आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले. (aaditya thackeray slammed shinde fadnavis government in worli)

मुंबईतल्या वरळी येथील जांभोरी मैदानात ठाकरे गटाचा कार्यकर्ता मेळावा पार पडला. या मेळाव्यात उपस्थित ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना संबोधित आदित्य ठाकरे यांनी केले. कार्यकर्त्यांना संबोधताना ठाकरेंनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व त्यांच्यावर गटावर निशाणा साधला. ‘मागील दोन अधिवेशनात आम्ही विधीमंडळाच्या पायऱ्यांवरबसून आंदोलन करत आहोत. त्यावेळी 50 खोके एकदम ओके अशा घोषणा देत असतो. पण त्यांच्यापैकी एकही सांगत नाही की आम्ही खोक्यांना हात नाही लावला. शिवसंवाद यात्रेच्या माध्यमातून मी राज्यभरात फिरलो. गद्दरांच्याही मतदार संघात गेलो असून सगळीकडे अशीच परिस्थिती आहे. शिवसेना जनतेच्या हृदयात आहे. ते यात बदल करू शकत नाही. सामान्य शिवसैनिकांना हे गद्दार सरकार घाबरते. ही आपली ताकद आहे. त्यांच्या मनात भिती असल्याने ते यंत्रणांचा गैरवापर करत आहेत. ये डर अच्छा है’, असे आदित्य ठाकरे म्हणाले.

- Advertisement -

‘त्यांनी कितीही कटआऊट ,बॅनर लावू दे, आपण असे करायचे नाही, ती आपली संस्कृती नाही येथील प्रत्येक ठिकाणी शिवसेनेने काम केले आहे. आपल्या अभ्यास गल्लीचे सर्वत्र कौतुक झाले आहे. आपण सुरू केलेले चांगले काम थांबवण्यात येत आहे. त्याला स्थगिती देण्यात येत आहे. त्यांनी कितीही तोडण्याचा फोडण्याचा प्रयत्न केला तरी हे प्रेम तो चोरू शकणार नाही. आपण या मैदानाचे सुशोभीकरण केले होते. मात्र, सत्ताधाऱ्यांनी काही कार्यक्रम केले आणि मैदानाची दुर्दशा केली’, असे आदित्य ठाकरे म्हणाले.

‘वरळीतील रहिवाशांची ही स्वप्नपूर्ती आहे. त्याची सुरुवात जांबोरी मैदानातून केली. बीडीडी चाळीच्या पुनर्विकासाचे काम महाविकास आघाडीच्या काळात सुरू झाले आहे. कोरोना काळात वरळीत घराघरात तपासणी करण्यात आली. कोरोना संकट काय असते, त्याचा सामना कसा करायचे, याची दिशा आपण देशाला दाखवली. मुंबईला दिल्लीसमोर झुकवण्याचा गद्दारांचा प्रयत्न आहे’, असे आदित्य ठाकरे म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा – देशद्रोह केलेल्यांसोबत चहा घेण्याची वेळ टळली – एकनाथ शिंदे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -