घरताज्या घडामोडीनवी मुंबईत 'आप' फॅक्टर, १११ जागा लढविणार!

नवी मुंबईत ‘आप’ फॅक्टर, १११ जागा लढविणार!

Subscribe

सध्या दिल्ली विधानसभा निवडणुकांचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. त्यातच आता आम आदमी पक्षाने दिल्लीसोबतच नवी मुंबईतही उतरण्याची तयारी केली आहे. येत्या महानगर पालिका निवडणुकांमध्ये आम आदमी पार्टी १११ जागा लढवणार आहे. नवी मुंबईच्या विकासाच्या मुद्यावर आम्ही महापालिका निवडणूक लढणार असल्याची माहिती आम आदमी पार्टीचे बेलापूर विधानसभा अध्यक्ष मयुर पंघाळ यांनी ‘आपलं महानगर’शी बोलताना दिली.

नवी मुंबईचा विकास दिशाहीन झाला आहे. झोपडपट्टी पुनर्वसन प्रश्न रखडलेला आहे. प्रस्थापित राजकारण्यांनी नवी मुंबईच्या विकासाच्या नावावर फक्त भ्रष्टाचाराला खतपाणी घातले, अशी टीका मयुर पंघाळ यांनी यावेळी केली. आप हा एक स्वतंत्र विचारांचा पक्ष आहे. नवी मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुकीत आम्ही आमचे सक्षम उमेदवार देऊ आणि नवी मुंबईच्या विकासाला नवी दिशा देऊ, अशी प्रतिक्रिया आपचे ठाणे जिल्हा अध्यक्ष विजय पंजवाणी यांनी आपलं महानगरशी बोलताना दिली.

- Advertisement -

दिल्ली विधानसभा निवडणुकांसाठी प्रचार शिगेला!

दिल्ली विधानसभा निवडणुकांसाठी आम आदमी पक्षाकडून जोरदार मोर्चेबांधणी केली जात असून खुद्द पक्षाचे मुख्य समन्वयक आणि दिल्लीचे विद्यमान मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी प्रचारासाठी कंबर कसली आहे. दिल्लीतील मतदारांशी संवाद साधण्यासाठी अरविंद केजरीवाल यांनी एक व्हिडिओ जारी केला असून या व्हिडिओची सध्या बरीच चर्चा सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. या व्हिडिओमध्ये अरविंद केजरीवाल एका मतदाराच्या घरात जाऊन तिथे दिल्ली सरकारने गेल्या ५ वर्षांमध्ये मतदारांसाठी केलेल्या वेगवेगळ्या कामांविषयी माहिती देत आहेत. या व्हिडिओमध्ये मतदारांना देखील वेगवेगळ्या विषयांवर माहिती मिळवण्यासाठी देण्यात आलेल्या वेगवेगळ्या पर्यायांवर इंटरॅक्टिव्ह पद्धतीने क्लिक करण्याचं आवाहन देखील केजरीवाल या व्हिडिओमध्ये करत आहेत.


इथे पाहा तो व्हिडिओ – अरविंद केजरीवाल यांचा हटके प्रचार! तुम्ही हा व्हिडिओ पाहिलात का?
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -