घरताज्या घडामोडीमुंबईतही लम्पी आजाराची लक्षणे; 'हा' परिसर बाधित म्हणून घोषित

मुंबईतही लम्पी आजाराची लक्षणे; ‘हा’ परिसर बाधित म्हणून घोषित

Subscribe

राज्याच्या अनेक गावातील जनावरांना 'लम्पी' या स्किन डिसीजची लागण होत आहे. अचानक ताप व त्वचेवर गुत्ती येत असल्याने पशुपालन शेतकरी बांधव चितांग्रस्त झाले आहेत. 'लम्पी' जनावराच्या आरोग्याच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित झाला आहे.

राज्याच्या अनेक गावातील जनावरांना ‘लम्पी’ या स्किन डिसीजची लागण होत आहे. अचानक ताप व त्वचेवर गुत्ती येत असल्याने पशुपालन शेतकरी बांधव चितांग्रस्त झाले आहेत. ‘लम्पी’ जनावराच्या आरोग्याच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित झाला आहे. लम्पी आजारावर मात करण्यासाठी सरकारी यंत्रणा शर्तीचे प्रयत्न करत आहेत. अशातच आता हा आजाराने मुंबईतही हातपाय पसरण्यास सुरूवात केली आहे. मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालय यांच्या आरे दुग्ध वसाहत येथील क्षेत्रातील जनावरांमध्ये लम्पी त्वचारोगाची लागण झाली आहे. (aarey dairy area lumpy infected animals found in mumbai)

मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालय यांच्या आरे दुग्ध वसाहतीमध्ये लम्पीची लक्षणे आढळल्याने पशुवैद्यकीय महाविद्यालय प्रक्षेत्र या संसर्ग केंद्रापासून 10 किलोमीटरपर्यंतचे क्षेत्र हे बाधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात येत असल्याचे मुंबई उपनगर जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी जाहीर केले आहे.

- Advertisement -

मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालय यांचे आरे दुग्ध वसाहत येथील क्षेत्रातील जनावरांमध्ये लम्पी त्वचा रोग आजाराची जनावरे आढळली आहेत. या रोगाचा प्रसार मुंबई उपनगर जिल्ह्यात इतर ठिकाणी होऊ नये यासाठी मुंबई उपनगर जिल्हातील प्राण्यांमधील ‘संक्रमण व सांसर्गिक रोगप्रतिबंधक व नियंत्रण अधिनियम 2009’ नुसार आरे दुग्ध वसाहत येथील मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालय क्षेत्र या संसर्ग केंद्रापासून 10 किलोमीटरपर्यंत ‘बाधित क्षेत्र’ म्हणून घोषित करण्यात आल्याचे समजते.

लम्पी रोगाची लक्षणे आढळल्याने बाधित क्षेत्रातील जनावरांचे शेड निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे. शिवाय, 10 किलोमीटर परिघातील परिसरात जनावरांची खरेदी व विक्री, वाहतूक, बाजार, जत्रा व प्रदर्शने आयोजित करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. या क्षेत्रातील 5 किमी परिघातील जनावरांना गोट पॉक्स लसीकरण तत्काळ करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत..

- Advertisement -

हेही वाचा – पत्राचाळ घोटाळ्यात ईडीच्या आरोपपत्रात शरद पवारांचा उल्लेख, भाजपाकडून चौकशीची मागणी

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -