व्हेल माश्याच्या १५ कोटी रुपयांच्या उलटीची तस्करी करणारा गजाआड

Aarey police arrest whale smuggler worth Rs 15 crore
व्हेल माश्याच्या १५ कोटी रुपयांच्या उलटीची तस्करी करणारा गजाआड

मुंबईतील आरे परिसरात व्हेल माश्याच्या उलटीची विक्री करण्यासाठी आलेल्या एका तस्कराला पोलिसांनी अटक केली आहे.त्याच्याकडून तब्बल १५ कोटी रुपयांची व्हेल माशाची उलटी जप्त करण्यात आली आहे. ही कारवाई मुंबईच्या आरे पोलिसांनी केली आहे. या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली असून, योगेश जोशी हे या आरोपीचे नाव आहे. योगेश जोशी हा आरोपी आरे परिसरात व्हेल माशाची विक्री करण्यासाठी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी एक टीम तयार करुन आरोपीला रंगेहाथ पकडले.

आरे पोलिसांनी ५ किलो ६५ ग्राम व्हेल माशाची उलटी जप्त केली आहे. मात्र या उलटीची बाजारामधील किंंमत १५ कोटी ६५ हजार रुपये इतकी आहे. याप्रकरणी एकाला पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणाचा आरे पोलीस अधिक तपास करीत आहेत.आरोपी योगेश जोशी याच्यावर वन्यजीव संरक्षण कायद्या अंतर्गत देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा आरोपी योगेश जोशी हा मूळचा बीड जिल्ह्यातील रहिवासी आहे. याबाबत पोलीस अधिक तपास करीत आहेत.

व्हेल माशाची ही उलटी म्हणजे एक दगडासारखा पदार्थ असतो. त्याला अ‍ॅम्बरग्रीस असे म्हटले जाते.या उलटीला जागतिक बाजारपेठेमध्ये मोठी किंमत मिळते. ‘स्पर्म’व्हेलच्या उलटीला अत्तराच्या व्यवसायात उद्योगात अतिशय महत्त्व आहे तिला भरमसाठ दर मिळून कोट्यवधीची कमाई मिळते. अत्तराचा सुगंध दीर्घकाळ दरवळत राहण्यासाठी या उलटीचा उपयोग केला जातो. मात्र ही उलटी बेकायदेशीर विकणे गुन्हा आहे.


 हे ही वाचा – नालासोपारा बनले वेश्या व्यवसायाचा अड्डा, ५००० बांग्लादेशी मुलींना वेश्या बनवणारा नराधम गजाआड