घरताज्या घडामोडीवसईत एका वर्षाच्या कुत्र्याचे अपहरण

वसईत एका वर्षाच्या कुत्र्याचे अपहरण

Subscribe

वसई येथे एका कुत्र्याचे अपहरण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लहान मुले, महिला, तरुणी यांचे अपहरण होत असल्याच्या घटना ऐकीवात होत्या. पण, वसईत चक्क पेट्रोलपंप मालकाच्या एक वर्षाच्या कुत्र्याच्या पिल्लाचे मोटारसायकलवरून आलेल्या दोघांनी अपहरण केल्याची घटना घडली आहे. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून याप्रकरणी पोलीस ठाण्यात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अशी उघडकीस आली घटना

वसई पूर्वेकडील गोखीवरे येथील रवी धोत्रे तीन ते चार दिवसांसाठी आपल्या परिवारासह गावाला गेले होते. यासाठी त्यांनी आपल्या हॅपी नावाच्या कुत्र्याला त्यांच्या फादरवाडी येथील पेट्रोल पंपावर कर्मचार्‍यांच्या देखरेखीखाली ठेवला होता. शनिवारी सकाळी जेव्हा धोत्रे परिवार गावावरून परत आले असता त्यांना कुत्रा चोरीला गेल्याचे समजले. हचेशन एस्सेर जातीचा हॅपी नावाचा कुत्रा शुक्रवारी रात्री साडेदहाच्या दरम्यान, पेट्रोल पंपावर पेट्रोल भरायला आलेल्या दुचाकीवरील दोन इसमानी या कुत्र्याला पळवून नेताना सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहे. याप्रकरणी वालीव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत. मुख्य म्हणजे हॅपी हा त्यांचा ६ वर्षीय मुलाचा आवडत कुत्रा असून तो चोरीला गेल्याने मुलाने जेवण सोडले आहे. त्यामुळे रवी धोत्रे यांनी कुत्रा ज्यांनी चोरला आहे त्यांना परत करण्याचे आवाहन केले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – आयर्लंडच्या पंतप्रधानांनी घेतल्यानी कोकणातल्या जेवणाचो आस्वाद


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -