घरताज्या घडामोडीAC Local Train Fare : उकाडा वाढताच AC लोकलची भरभराट; एकाच दिवसात...

AC Local Train Fare : उकाडा वाढताच AC लोकलची भरभराट; एकाच दिवसात इतक्या पासांची विक्री

Subscribe

मागील काही दिवसांपासून मुंबईसह आसपासच्या परिसरात उकाड्यात प्रचंड वाढ झाली आहे. वाढत्या तापमानामुळे नागरिक हैराण झाले आहेत. अशातच पश्चिम रेल्वे मार्गावरील प्रवाशांनी वाढत्या उकाड्याच्या पार्श्वभूमीवर एसी लोकलला पसंती दिल्याची माहिती समोर येत आहे.

मुंबई : मागील काही दिवसांपासून मुंबईसह आसपासच्या परिसरात उकाड्यात प्रचंड वाढ झाली आहे. वाढत्या तापमानामुळे नागरिक हैराण झाले आहेत. अशातच पश्चिम रेल्वे मार्गावरील प्रवाशांनी वाढत्या उकाड्याच्या पार्श्वभूमीवर एसी लोकलला पसंती दिल्याची माहिती समोर येत आहे. त्यानुसार 1 एप्रिल या एकाच दिवसांत तब्बल 3,500 हून अधिक प्रवाशांनी मासिक पास खरेदी केले आहेत. (AC Local Train Fare Over 3500 Monthly Passes For AC Locales On A Single Day in Mumbai)

मुंबई लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून, रेल्वे स्थानकांवरील गर्दीतही वाढ झाली आहे. परिणामी धक्काबुक्कीचा त्रास सहन करत प्रवाशांना लोकलने प्रवास करावा लागतो. अशातच उकाडा वाढल्याने अनेक प्रवाशांनी सर्वसामान्य लोकलने प्रवास करणे टाळत एसी लोकलचा प्रवास सुरू केला आहे. यासाठी दररोज तिकीट काढण्याऐवजी पासची सुद्धा खरेदी या प्रवाशांनी केली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – रेल्वेची कामे संथ गतीने, लोकल समस्या कायमच

त्यानुसार, प्रवाशांनी १ एप्रिल रोजी 27,184 तिकीटे आणि पास काढले. यामध्ये 3,561 मासिक पास आणि 23,623 तिकिटांचा समावेश आहे. याआधी 4 मार्च रोजी 23,062 तिकीटे काढली. तसेच, पासही काढण्यात आले असून यातील 3,623 मासिक पास आणि 19,439 तिकीटे काढली.

- Advertisement -

दरम्यान, मुंबई महानगरात उन्हाच्या झळा तीव्र होऊ लागल्या आहेत. उष्णता वाढू लागल्याने पश्चिम रेल्वेवरील प्रवाशांचा वातानुकूलित लोकलचा मासिक पास काढण्याकडे कल वाढला आहे. राज्यासह देशभरात अनेक भागांत एप्रिल ते जून महिना तीव्र उकाडा जाणवू शकतो, अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.


हेही वाचा – Mumbai Local : मुंबई लोकलचं तिकीट गुजराती भाषेत; सोशल मीडियावर रंगला वाद

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -