घरताज्या घडामोडीप्रगतीपथावरील ९५ रस्त्यांची कामे पावसाळ्यापूर्वी होणार पूर्ण; पालिकेचा दावा

प्रगतीपथावरील ९५ रस्त्यांची कामे पावसाळ्यापूर्वी होणार पूर्ण; पालिकेचा दावा

Subscribe

मुंबई महापालिकेने मागील वर्षी मंजूर केलेल्या रस्ते विकासकामांमधील सध्या २०७ रस्त्यांची कामे प्रगतीपथावर आहेत. या सर्व कामांपैकी एकूण ९५ रस्त्यांची कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्यात येणार असल्याचा दावा महापालिकेने केला आहे.

मुंबई महापालिकेने मागील वर्षी मंजूर केलेल्या रस्ते विकासकामांमधील सध्या २०७ रस्त्यांची कामे प्रगतीपथावर आहेत. या सर्व कामांपैकी एकूण ९५ रस्त्यांची कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्यात येणार असल्याचा दावा महापालिकेने केला आहे. प्रगतीपथावर असलेल्या या कामांमध्ये अंधेरी, घाटकोपर लिंक रोड, ‘जी दक्षिण’ विभागातील शंकरराव नरम मार्ग, घाटकोपर मानखुर्द लिंक रोड, वांद्रे पूर्व परिसरातील हरिमंदिर मार्ग या रस्त्यांचा प्रामुख्याने समावेश असल्याचे म्हटले आहे.

दरवर्षी पावसाळ्यापूर्वी महापालिका क्षेत्रातील रस्त्यांची दुरुस्ती व बांधकाम कामे हाती घेतली जातात. त्यामुळे खराब झालेल्या रस्त्यांच्या कामांचा विकास करण्यासाठी काही रस्ते कामांचे प्रस्ताव मागील वर्षी शेवटला मंजुर करण्यात आली होती. त्यामुळे ही पावसाळा पूर्व कामे सुरु असतानाच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन जाहीर करण्यात आले. मात्र, या लॉकडाऊनच्या काळात रस्ते मोकळे असल्याने रस्त्यांची कामे सुरळीत पार पडली गेली असती. परंतु लॉकडाऊनमुळे कामगार वर्गच नसल्याने कंत्राटदारांना आपली कामे सुरु ठेवता आली नाही. परंतु महापालिका आयुक्त प्रविणसिंह परदेशी यांनी सर्व कंत्राटदारांची बैठक घेवून त्यांना प्रगतीपथावरील कामे पूर्ण करण्याचे आवाहन केले. त्यानुसार मागील आठवड्यात कंत्राटदारांनी कामगारांना दुप्पट पैसे देत ही कामे सुरु केली.

- Advertisement -

या भागातील कामांचा समावेश

शहर भागातील ३५, पूर्व उपनगरातील ४६ आणि पश्चिम उपनगरांतील १२६ अशाप्रकारे एकूण सध्या  २०७ ठिकाणी रस्त्यांची कामे सुरु आहेत. या २०७ कामांपैकी ९५ ठिकाणची  रस्त्यांची कामे ही पावसाळ्यापूर्वी पूर्ण होतील, अशा पद्धतीने कामाच्या वेळा निश्चित केल्या आहेत.  या ९५ रस्त्यांच्या कामांमध्ये शहर भागातील ३३, पूर्व उपनगर भागातील २४ आणि पश्चिम उपनगर भागातील ३८ कामांचा समावेश आहे.

उर्वरित टप्पे हे पावसाळ्यानंतर हाती घेणार

त्याचबरोबर यापूर्वी सुरु असलेल्या कामांसह नव्याने मंजूर झालेल्या कामांपैकी एकूण २७९ रस्त्यांची कामे ही पावसाळ्यापूर्वी अधिकाधिक प्रमाणात वाहतुकीच्या दृष्टीकोनातून योग्य राखण्याचा प्रयत्न करत आहे. जेणेकरून पावसाळ्यादरम्यान वाहतुकीसाठी या रस्त्यांचा वापर करता येईल. तर या रस्ते कामांचे उर्वरित टप्पे हे पावसाळ्यानंतर हाती घेण्यात येणार आहेत.

‘सोशल- डिस्टन्सींग’ काटेकोरपणे

या सर्व संबंधित व्यक्तींनी व कामाच्या ठिकाणी असणाऱ्या कामगार -कर्मचारी- अधिकाऱ्यांद्वारे ‘सोशल- डिस्टन्सींग’ काटेकोरपणे पाळण्यात येत आहे. तसेच मुखावरणे (मास्क) देखील नियमितपणे वापरण्यात येत आहेत. कंत्राटदारांनीही त्यांच्या मनुष्यबळाकडून रस्ते विषयक कामे करवून घेताना, या बाबींचे काटेकोरपणे पालन करत असल्याची खातरजमा नियमितपणे व वेळोवेळी करून घ्यावी, असेही निर्देश यापूर्वीच देण्यात आले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -