घरमुंबईराष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात हालचालींना वेग, राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची उद्या बैठक

राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात हालचालींना वेग, राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची उद्या बैठक

Subscribe

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून शिवसैनिक आणि आमदारांशी संवाद साधला . यावेळी . आमदारांना भावनिक साद घालून त्यांनी परत येण्याचे आवाहन केले. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात हालचाली वाढल्या आहेत. राष्ट्रवादीने आपल्या सर्व आमदारांची उद्या बैठक बोलावली आहे.

राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांनी उद्या बैठकीला हजर राहण्याचे आदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिले आहेत. या बैठकीत शरद पवार आमदारांना मार्गदर्शन करणार आहेत. याच बैठकीबाबतची अधिक माहिती राष्ट्रवादीचे नेते दत्तात्रय भरणे यांनी दिली. आज मंत्रिमंडळ बैठकीच्या निमित्ताने आम्ही सर्व मंत्री एकत्र आलो होतो. उद्या राष्ट्रवादी पक्षाची बैठक बोलावण्यात आली आहे. शरद पवार यांची बैठक आहे त्यामुळे सर्वच आमदार हजर राहणार आहेत. जयंत पाटील यांनी ही बैठक बोलावली आहे, असे भरणे म्हणाले.

- Advertisement -

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे भाषण सर्वांनीच एकले आहे. उद्या राष्ट्रावादीची बैठक बोलावण्यात आली आहे. सरकार धोक्यात आहे की नाही हे उद्याच्या बैठकीनंतर तसेच काही घडामोडी घडल्यानंतरच हे समजू शकेल, असेही दत्तात्रय भरणे म्हणाले.

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -