घरताज्या घडामोडीचेंबूर येथे गारमेंटचा भाग कोसळला; १२ जण जखमी

चेंबूर येथे गारमेंटचा भाग कोसळला; १२ जण जखमी

Subscribe

चेंबूर येथील गणेश नगर झोपडपट्टीतील इंडस्ट्रीयल भागात असलेल्या तळमजला अधिक एक मजली गारमेंटमधील पोटमाळ्याचा भाग अचानक कोसळण्याची घटना गुरुवारी दुपारच्या सुमारास घडली. या घटनेत १२ जण जखमी झाले आहेत. त्यापैकी ७ जणांना नजिकच्या इनलॅक रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असून त्यापैकी एकाची प्रकृती गंभीर आहे. (Accident in Chembur)

चेंबूर येथील मोनो रेल्वेजवळील पोल नंबर १०, नवजीवन सोसायटी, सनसिटी हॉटेलजवळ, पुष्पक कंपाउंड, गणेशनगर या ठिकाणी झोपडपट्टीतील इंडस्ट्रीयल भागात काही छोटे छोटे कारखाने, गारमेंट, लघुउद्योग वगैरे आहेत. या ठिकाणी एक मजली गारमेंटमध्ये काही कामगार पोटमाळ्याच्या ठिकाणी तर काहीजण खालील भागात काम करीत असत. गुरुवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास सदर एक मजली गारमेंटमध्ये पोटमाळ्याचा भाग अचानकपणे कोसळला. ही घटना घडली त्यावेळी मोठा आवाज झाला. आजूबाजूचे लोक तातडीने घटनास्थळी धावून आले व बचावकार्य सुरू करण्यात आले.

- Advertisement -

यावेळी, सदर दुर्घटनेत १२ जण जखमी झाले आहेत. त्यापैकी ५ जणांना किरकोळ मार लागला व ते थोडक्यात बचावले. तर ७ जण जखमी झाल्याने नजिकच्या इनलॅक रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यापैकी एकजण गंभीर जखमी आहे.

सदर घटनेची माहिती मिळताच भाजपचे माजी नगरसेवक महादेव शिवगण यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. सदर घटनेतील जखमींपैकी एकाची प्रकृती गंभीर आहे. उर्वरित जखमींना बरे वाटल्यावर त्यांना रुग्णालयामधून घरी पाठविण्यात येईल. घटनास्थळी युद्धपातळीवर मदतकार्य सुरू आहे, अशी माहिती माजी नगरसेवक महादेव शिवगण यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना दिली.

- Advertisement -

रूग्णालयात दाखल जखमींची नावे –
(१) मुराद अली (२२)
(२)धीरज कुमार (१९)
(३)रेहान खान (१९)
(४)विलास कुलकर्णी (५८)
(५)मोहन पाठक (५५)
(६) प्रेमनाथ धनावडे (५३)
(७) मुरारी झा (२२)

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -