Eco friendly bappa Competition
घर ठाणे Accident In Thane : ठाण्यात लिफ्ट कोसळून 7 कामगारांचा मृत्यू; दोन जण गंभीर जखमी

Accident In Thane : ठाण्यात लिफ्ट कोसळून 7 कामगारांचा मृत्यू; दोन जण गंभीर जखमी

Subscribe

बाळकुम येथील नारायणी शाळेच्या बाजूला रुणवाल आयरीन या नुकतेच बांधकाम पूर्ण झालेल्या 40 मजली इमारतीच्या छतावर वॉटरप्रूफिंगचे काम सुरू होते

ठाणे : बाळकुम परिसरात असलेल्या रुणवाल आयरीन या 40 मजली इमारतीवरून लिफ्ट कोसळून 7 कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही घटना आज 10 सप्टेंबर रोजी सायंकाळी घडली. या अपघातात दोन कामगार गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून पोलीस याप्रकरणी अधिक चौकशी करत आहेत.(Accident In Thane  7 workers died in lift collapse in Thane; Two people were seriously injured)

बाळकुम येथील नारायणी शाळेच्या बाजूला रुणवाल आयरीन या नुकतेच बांधकाम पूर्ण झालेल्या 40 मजली इमारतीच्या छतावर वॉटरप्रूफिंगचे काम सुरू होते. हे काम संपवून कामगार खाली येत असताना लिफ्टचा दोर तुटल्याने हा अपघात घडला.

घटनास्थळी बचावकार्य सुरू

- Advertisement -

घटनेची माहिती प्रत्यक्षदर्शींनी बाळकुम अग्निशमन दलाला कळवली. तातडीने बाळकुम अग्निशमन दलाचे स्टेशन अधिकारी ओमकार वैती घटनास्थळी टीमसह पोहोचले. तसेच या घटनेची माहिती मिळताच स्थानिक माजी नगरसेवक संजय भोईर यांनी दुर्घटनास्थळी धाव घेत बचाव कार्यात मदत केली.

हेही वाचा : आम्ही कुठल्याही दबावाला भीक घालणारी माणसं नाही; अजित पवारांचे खणखणीत उत्तर

अडकलेल्यांचा झाला मृत्यू

- Advertisement -

बचाव पथकाने लिफ्टमध्ये अडकलेल्या कामगारांना बाहेर काढले. या दुर्घटनेत पाच कामगारांचा जागीच मृत्यू झाला होता. तर गंभीर जखमी दोन कामगारांना खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले. ही दुर्घटना नेमकी कशी घडली याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.

ही आहेत मृतकांची नावे

बाळकुम परिसरात असलेल्या रुणवाल आयरीन या 40 मजली इमारतीच्या लिफ्टचा रोप तुटून झालेल्या अपघातात खाली येणाऱ्या सहा कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना रविवारी सायंकाळी 5 ते पावणे सहा वाजण्याच्या सुमारास घडली. या अपघातात कामगार मृत पावले आहेत. या घटनेने ठाणे शहरात खळबळ उडाली होती.

मृत कामगारांची नावं

महेंद्र चौपाल (३२), रुपेश कुमार दास (२१), मुंबई कुर्ला येथील लिफ्ट ऑपरेटर हारून शेख (६७), नवी मुंबई,दिघा येथील मिथलेश विश्वकर्मा (३०), नवीन विश्वकर्मा (२२), बिहार येथील कारी दास (३५) आणि सुनील कुमार दास (२१) अशी आहेत.

हेही वाचा : नरेंद्र मोदींना विचारा गेट वे ऑफ इंडियाला काय म्हणू? शरद पवारांचा थेट सवाल

वॉटरप्रूफिंगचे सुरू होते काम

लिफ्ट कोसळून मृत्यू झालेल्या या घटनेबाबत अधिक माहिती समोर आली आहे. नुकतेच बांधकाम पूर्ण झालेल्या या 40 मजली इमारतीच्या छतावर वॉटरप्रूफिंगचे काम सुरू होते. हे काम संपवून कामगार खाली येत असताना हा अपघात घडला. या घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आहेत.

बिल्डर आणि ठामपा अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करा- केदार दिघे 

बाळकुम परिसरात लिफ्टचा रोप तुटून झालेल्या अपघातात सहा कामगारांचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर शिवसेना ( उबाठा) ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे यांनी ट्विट करत बिल्डर आणि ठामपा अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करा तसेच त्यांना अटक करा अशी मागणी केली आहे. तसेच त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यात नगररचना विभागाचा आधीच भोंगळ कारभार असून अनधिकृत बांधकामे जोमात असल्याचा आरोप करत मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे.

- Advertisment -