घरमुंबईAccident News : फिल्मसिटीमध्ये भिंत कोसळून दोघांचा मृत्यू, एक जखमी

Accident News : फिल्मसिटीमध्ये भिंत कोसळून दोघांचा मृत्यू, एक जखमी

Subscribe

प्राप्त माहितीनुसार, गोरेगाव (पूर्व), आरे कॉलनी रोड, प्राईम फॉक्स प्रोडक्शन, फिल्म सिटी गेट क्रमांक 2 येथे शनिवारी नेहमीप्रमाणे कामकाज सुरू होते. मात्र सायंकाळी 6.15 वाजताच्या सुमारास गेट क्रमांक 2 जवळील 60 फूट लांब आणि 20 फूट उंच भिंत अचानकपणे कोसळली.

मुंबई : गोरेगाव, आरे कॉलनी रोड, फिल्मसिटी गेट क्रमांक 2 येथे एक मोठी भिंत शनिवारी (24 फेब्रुवारी) सायंकाळच्या सुमारास अचानकपणे कोसळली. या दुर्घटनेत तिघेजण जखमी झाले. त्यापैकी दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. त्यामुळे फिल्मसिटी परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. (Accident News Two dead one injured after wall collapses in Filmcity)

प्राप्त माहितीनुसार, गोरेगाव (पूर्व), आरे कॉलनी रोड, प्राईम फॉक्स प्रोडक्शन, फिल्म सिटी गेट क्रमांक 2 येथे शनिवारी नेहमीप्रमाणे कामकाज सुरू होते. मात्र सायंकाळी 6.15 वाजताच्या सुमारास गेट क्रमांक 2 जवळील 60 फूट लांब आणि 20 फूट उंच भिंत अचानकपणे कोसळली. या दुर्घटनेत तीन पुरुष अडकले व जखमी झाले. या दुर्घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी व पोलिसांनी तत्काळ घटनसाठलिधव घेवून बचावकार्यासाठी धावपळ केली.

- Advertisement -

हेही वाचा : Cancer Hospital : वांद्रे येथे उभे राहणार 165 खाटांचे कॅन्सर रुग्णालय; शेलारांच्या प्रयत्नांना यश

यावेळी अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले होते. मात्र, अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचण्यापूर्वीच स्थानिकांनी भिंत दुर्घटनेत जखमी तिघांना भिंतीच्या ढिगाऱ्यामधून जखमी अवस्थेत बाहेर काढून 108 क्रमांच्या रुग्णवाहिकेद्वारे नजिकच्या ट्रॉमा केअर रुग्णालयात उपचारासाठी नेले. मात्र, तिन्ही जखमींपैकी सिंतू मंडल (32) आणि जयदेव प्रल्हाद विश्वास (45) या दोघांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. तर तिसऱ्या जखमी व्यक्तीचे नाव समजू शकलेले नसून त्यावर उपचार सुरू असल्याचे समजते.

- Advertisement -

हेही वाचा : Mumbai News : भारत अध्यात्मिक शक्तीने विश्वगुरू बनेल- लोढा

अग्निशमन दलाकडून बचावकार्य सुरू

घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस मुंबई महानगरपालिकेची टीम घटनास्थळी दाखल झाले आहेत. शिवाय अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळावर दाखल झाले असून बचावकार्य सुरु करण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -