घरमुंबईकसारा घाट की मृत्यूचा सापळा?

कसारा घाट की मृत्यूचा सापळा?

Subscribe

मुंबई- नाशिक महामार्गावर १० महिन्यांत १०१ अपघात

मुंबई -नाशिक -आग्रा या राष्ट्रीय महामार्गावरील भिवंडी ते सोनावळे फाटा ते कसारा चिंतामणवाडी या महामार्गावर पोलिसांच्या 72 किलोमीटरच्या कार्यक्षेत्रात जानेवारी ते ऑक्टोबर या 2019 या वर्षांतील दहा महिन्यांच्या कालावधीत महामार्गावर एकूण 101 अपघात झाले आहेत. अशी धक्कादायक माहिती शहापूर महामार्ग पोलिसांनी दिली. महामार्गावर खर्डी जवळ महाराष्ट्रातील प्रसिध्द गायिका गीता माळी यांच्या दुर्दैवी अपघाताच्या घटनेनंतर महामार्गावरील वाढत्या अपघाताबाबत गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे. सध्या मुंबई-नाशिक महामार्गावर अपघाताची मालिकाच सुरू असून कसारा घाट हा वाहनचालक व प्रवाशांकरता अक्षरशः मृत्यूचा सापळाच बनला आहे.

मुंबई-नाशिक महामार्गावरील 72 किलोमीटरच्या क्षेत्रात अपघाताची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. यात 49 प्राणांतीक अपघात झाले असून यात मृत 53 तर जखमी 24 आहेत, तर गंभीर अपघात एकूण 23 झाले असून यात 38 जखमी झाले, तर किरकोळ अपघात 29 झाले आहेत. यात 45 जखमी झाले आहेत. अशा प्रकारे एकूण 101 अपघात वर्षभरातील 10 महिन्यांत झाले असल्याची चिंताजनक आकडेवारी शहापूर महामार्ग पोलिसांकडून हाती हाती आली आहे.
मोटारसायकल, कार जीप, टेम्पो, ट्रक, कंटेनर, टँकर, ट्रेलर या वाहनांचा अपघातात समावेश आहे. महामार्ग पोलीस घटक केंद्र शहापूर यांच्या कार्यक्षेत्रात सोनावळे फाटा भिवंडी ते चिंतामणवाडी कसारा घाट असे हे एकूण 72 किलोमीटर अंतर येत असून या लांबलचक पल्ल्याच्या कार्यक्षेत्रात हेे अपघात घडले आहेत. महामार्गावरील वाढत्या अपघाताची वेगवेगळी कारणे असल्याचे महामार्ग पोलिसांनी सांगितले.

- Advertisement -

ही आहेत अपघाताची कारणे
निष्काळजीपणे, बेदरकारपणे वाहन चालविणे, हुल देणे, वाहनांशी स्पर्धा करणे, उभ्या वाहनास मागून धडक देणे, मद्यपान करून वाहन चालविणे, ओव्हरटेक, वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणे, चौपदरीकरणाचा कसारा घाटातील वळणा वळणाचा रस्ता,अपूर्ण कामे आणि वाहनांची वाढती संख्या अशा बहुतांश कारणांमुळे महामार्गावर अपघात होत आहेत. या महामार्गावर अपघात वाढतच आहेत. असे महामार्ग पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

१४ हजारांचा दंड वसूल
अपघात रोखण्यासाठी जनजागृती केली जात असून नियमांचे उल्लंघन करणार्‍या एकूण 14 हजार 5,45 वाहनचालकांवर कारवाई करून गेल्या दहा महिन्यांत 20 लाख 400 रुपये एवढा दंड वसूल करण्यात आल्याचे शहापूर महामार्ग पोलीस ठाण्यातून सांगण्यात आले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -