श्रद्धाचे तुकडे करण्यासाठी अनेक हत्यारांचा वापर केला, आफताबच्या चौकशीतून उघड

संपूर्ण देशाला हादरवून टाकणाऱ्या श्रद्धा हत्या प्रकरणात अनेक मोठे खुलासे समोर येत आहेत. दिल्ली पोलिसांनी आरोपी अफताबची चौकशी करताना त्यानी दिलेल्या माहितीच्या आधार तपासाला सुरूवात केली आहे. अफताबने श्रद्धाची हत्या करण्यासाठी अनेक हत्यार वापरली होती.

संपूर्ण देशाला हादरवून टाकणाऱ्या श्रद्धा हत्या प्रकरणात अनेक मोठे खुलासे समोर येत आहेत. दिल्ली पोलिसांनी आरोपी अफताबची चौकशी करताना त्यानी दिलेल्या माहितीच्या आधार तपासाला सुरूवात केली आहे. अफताबने श्रद्धाची हत्या करण्यासाठी अनेक हत्यार वापरली होती. गेल्या काही दिवसांत, पोलिसांनी 5 मोठे चाकू जप्त केले आहेत जे तपासासाठी फॉरेन्सिक टीमकडे पाठवण्यात आले आहेत अशी माहिती दिल्ली पोलीस सुत्रांनी दिली आहे.

श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे करण्यासाठी आरोपी आफताबने एका मोठ्या करवतसह पाच चाकुंचा वापर केला होता. चौकशीदरम्यान आफताबने पोलिसांना ही माहिती दिली. पाच चाकु पोलिसांनी हस्तगत केले आहेत. ये चाकू नियमीत वापरात येणाऱ्या किचन चाकूंपेक्षा वेगळे आहेत. पाच ते सहा इंच लांब असलेले हे चाकू खूप धारधार आहेत. हे पाचही चाकू पोलिसांनी तपासासाठी पाठवले आहेत. मात्र, करवत अद्याप पोलिसांच्या हाती लागलेली नाही.

दरम्यान, दिल्ली पोलिसांनी वसई पोलिसांच्या मदतीने भाईंदरच्या खाडीत शोधकार्य केले. महाराष्ट्रातील ठाणे (ग्रामीण) भाईंदर खाडी परिसरात दिल्ली पोलिसांचे पथक पुरावे शोधत आहेत. श्रद्धाची हत्या केल्यानंतर दोन आठवड्यांनी आफताबने आपल्या वसई येथील घरातून 37 बॉक्स हे दिल्लीला पाठवले होते. या 37 बॉक्समध्ये नेमके काय सामान होते याची आता जोरदार चर्चा रंगली आहे.

एका कुरिअर कंपनीच्या माध्यमातून त्याने बॉक्स दिल्लीला पाठवले होते. तसेच त्यासाठी पैसेही दिले होते. दिल्ली पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आफताबने दिल्ली पोलिसांना सांगितले होते की, दिल्लीला जाण्यापूर्वी वसई भागातील त्यांच्या घरातून सामान नेण्यासाठी पैसे कोण देणार यावरून त्यांचे आणि श्रद्धाचे भांडण झाले होते. आता पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.

आफताबविरोधात सबळ पुरावे गोळा करण्यात पोलिसांना यश आले आहे. श्रद्धाच्या मोबाईलचा कसून शोध घेतला जातोय. श्रद्धा वालकर हत्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी दिल्ली पोलीस भाईंदरमध्ये धडकले आहेत. भाईंदरच्या खाडीत दिल्ली पोलिसांचं सर्च ऑपरेशन सुरू आहे.


हेही वाचा – केंद्राने ‘हे सॅंपल’ परत न्यावं अन्यथा महाराष्ट्र बंद; राज्यपालांच्या वक्तव्यावर उद्धव ठाकरे आक्रमक