Maharashtra Assembly Election 2024
घरक्राइमCrime News : नऊ वर्षांच्या मुलाच्या हत्येप्रकरणी आरोपीस अटक; पुरावे नष्ट करून...

Crime News : नऊ वर्षांच्या मुलाच्या हत्येप्रकरणी आरोपीस अटक; पुरावे नष्ट करून बिहारला गेला पळून

Subscribe

अपहरण झालेल्या एका नऊ वर्षांच्या मुलाची हत्या केल्याप्रकरणी महेश्‍वरी मुखिया या आरोपीस सांताक्रुज पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला वांद्रे येथील स्थानिक न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

मुंबई : अपहरण झालेल्या एका नऊ वर्षांच्या मुलाची हत्या केल्याप्रकरणी महेश्‍वरी मुखिया या आरोपीस सांताक्रुज पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला वांद्रे येथील स्थानिक न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. (accused arrested for killing nine-year-old boy; destroyed the evidence and fled to bihar)

मृत मुलगा हा सांताक्रुज येथे त्याच्या कुटुंबियांसोबत राहत होता. 7 नोव्हेंबरला तो छट पूजेसाठी त्याच्या कुटुंबियांसोबत सांताक्रुज चौपाटी येथे गेला होता. मात्र रात्री उशिरापर्यंत तो घरी आला नाही. त्यामुळे त्याच्या पालकांनी त्याचा शोध घेतला, मात्र तो कुठेच सापडला नाही. त्यामुळे त्याच्या मिसिंगची तक्रार वडिलांनी सांताक्रुज पोलीस ठाण्यात केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी मुलाचा शोध घेण्यास सुरुवात केली.

- Advertisement -

हेही वाचा – Ahmednagar News : जम्मू-काश्‍मीरच्या नऊ जणांना अटक; आरोपींकडून 9 रायफली, 58 काडतुसे जप्त

शोधमोहिमेदरम्यान 11 नोव्हेंबरला त्याचा मृतदेह पोलिसांना परिसरातील एका दुकानाजवळ सापडला. त्याचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत होता. मात्र, त्याच्या आई – वडिलांनी तो त्यांचाच मुलगा असल्याचे ओळखले. शवविच्छेदन अहवालात त्याची गळा आवळून हत्या झाल्याचे उघडकीस आले होते. मुलाच्या हत्येनंतर पुरावा नष्ट करुन महेश्‍वरी हा त्याच्या बिहार येथील गावी पळून गेला होता. त्यामुळे या हत्येसह हत्येचा पुरावा नष्ट केल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवून पळून गेलेल्या मारेकर्‍याचा शोध घेण्यास सुरुवात केली.

- Advertisement -

ही शोधमोहीम सुरू असताना सीसीटीव्ही फुटेजमध्ये या मुलासोबत महेश्‍वरी हा दिसला होता. त्याचा शोध सुरू असताना तो बिहारला पळून गेल्याचे पोलिसांना समजले. त्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक वैभव शिंगारे यांच्या पथकातील पोलीस निरीक्षक ज्योती हिबारे, रणजीत आंधळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक तुषार सावंत, सुयोग अमृतकर, पोलीस उपनिरीक्षक धनंजय आव्हाड, शशिकांत हिंगवले, हिरेमठ, गावडे यांनी बिहारला पळून गेलेल्या महेश्‍वरी मुखियाला चौकशीसाठी ताब्यात घेतले. चौकशीत त्यानेच या मुलाची हत्या केल्याची कबुली दिली. त्यानंतर त्याला पुढील चौकशीसाठी मुंबईत आणले. हत्येच्या याच गुन्ह्यांत अटक केल्यानंतर त्याला रविवारी दुपारी वांद्रे येथील स्थानिक न्यायालयाने 19 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या हत्येमागील कारण समजू शकले नाही. मात्र अंधारात ओरडत असल्याने त्याची हत्या केल्याचे महेश्वरी याने सांगितले. या हत्येमागे अन्य काही कारण आहे का याचा तपास पोलीस करत आहेत. (accused arrested for killing nine-year-old boy; destroyed the evidence and fled to bihar)

हेही वाचा – Maharashtra Election 2024 : छ. संभाजीनगरमध्ये 5 कोटींची रक्कम जप्त तर…; पोलिसांनी दिली ही माहिती


Edited by : Ashwini A. Bhatavdekar

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -