Maharashtra Assembly Election 2024
घरक्राइमBaba Siddique : बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी अकोला येथून आरोपीस अटक; अटक आरोपींची...

Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी अकोला येथून आरोपीस अटक; अटक आरोपींची संख्या 26

Subscribe

राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दिकी यांच्या हत्येप्रकरणी सुमित दिनकर वाघ या 26 वर्षांच्या आरोपीस अकोला येथून गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी अटक केली. पुढील चौकशीसाठी त्याला मुंबईत आणले जात असून त्याला नंतर किल्ला न्यायालयात हजर केले जाणार आहे.

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दिकी यांच्या हत्येप्रकरणी सुमित दिनकर वाघ या 26 वर्षांच्या आरोपीस अकोला येथून गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी अटक केली. पुढील चौकशीसाठी त्याला मुंबईत आणले जात असून त्याला नंतर किल्ला न्यायालयात हजर केले जाणार आहे. सुमितच्या अटकेने या गुन्ह्यांतील अटक आरोपींची संख्या आता 26 झाली आहे. (accused arrested from akola in baba siddiqui murder case; the number of arrested accused is 26)

बाबा सिद्दिकी हत्येनंतर मुंबई पोलिसांनी आतापर्यंत 26 आरोपींना अटक केली असून त्यापैकी तीन आरोपी पोलीस तर इतर बावीस आरोपी न्यायालयीन कोठडीत आहे. याच गुन्ह्यांत सुमित वाघ यांचा सहभाग उघडकीस आला होता. त्यामुळे त्याच्या अटकेसाठी मुंबई पोलिसांचे एक पथक नागपूरला गेले होते. या पथकाने अकोला येथून सुमितला चौकशीसाठी ताब्यात घेतले. चौकशीत त्याचा या गुन्ह्यांत सहभाग उघडकीस येताच त्याला पोलिसांनी अटक केली.

- Advertisement -

हेही वाचा – Sexual Assault : मॉडेलवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी एकास अटक; मोबाइलवर काढले अश्‍लील व्हिडीओ

सुमित हा अकोला येथील अकोट, पणजचा रहिवाशी आहे. त्याने गुजरातच्या कर्नाटक बँकेत उघडलेल्या बँक खात्यातून नरेशकुमार, रुपेश मोहोळ, हरिशकुमारला ऑनलाईन पैसे ट्रान्स्फर केले होते. या गुन्ह्यांतील अटकेत असलेला आरोपी सलमानभाई बोहरा यासाठी त्याने सिमकार्ड खरेदी करुन त्याचा वापर इंटरनेट बॅकिंगसाठी केला होता.

- Advertisement -

सुमित या गुन्ह्यातील वॉण्टेड आरोपी शुभम लोणकर याच्या संपर्कात होता. त्याच्याच सांगण्यावरून त्याने हत्येसाठी आलेली रक्कम इतर आरोपींच्या बँक खात्यात ट्रान्स्फर केली होती. सलमानभाईला बँकेत खाते उघडण्यास त्याने मदत केल्याचे तपासात उघडकीस आले होते. त्याला पुढील चौकशीसाठी मुंबईत आणले जात आहे. त्यानंतर त्याला किल्ला न्यायालयात हजर केले जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. (accused arrested from akola in baba siddiqui murder case; the number of arrested accused is 26)

हेही वाचा – Andhare on Shinde : सहज आठवण करून द्यावी म्हटलं…निकालापूर्वी अंधारेंनी सीएम शिंदेंना डिवचलं


Edited by : Ashwini A. Bhatavdekar

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -