मुंबई : सायबर ठगांना बँक खाती पुरविणार्या हैदर अब्दुल कादर सय्यद ऊर्फ साहिल या 26 वर्षांच्या आरोपी तरुणाला सायबर सेल पोलिसांनी अटक केली. अलीकडेच एका जोडप्याची शेअर ट्रेडिंगच्या माध्यमातून 36 लाखांची फसवणूक झाली होती. या फसवणुकीची काही रक्कम साहीलने उघडलेल्या बँक खात्यात जमा झाली होते. त्यामुळे त्याच्यावर अटकेची कारवाई करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत असून त्याची पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. (accused providing bank accounts to cyber criminals arrested a couple of malad was extorted 36 lakhs)
तक्रारदार वयोवृद्ध मालाड परिसरात त्यांच्या पत्नीसोबत राहतात. सप्टेंबर महिन्यांत त्यांना एका खासगी कंपनीच्या व्हॉट्सऍप ग्रुपमध्ये ऍड करण्यात आले होते. हा ग्रुप शेअरसंदर्भातील होता. ग्रुपमधील अनेकांनी कंपनीच्या माध्यमातून शेअरमध्ये गुंतवणूक केली होती. त्यात त्यांना चांगला परतावा मिळाला होता. त्यामुळे ग्रुप ऍडमिनच्या सांगण्यावरुन त्यांनी त्यांच्या पत्नीसोबत कंपनीच्या माध्यमातून विविध शेअरमध्ये 36 लाख 50 हजाराची गुंतवणूक केली होती. या गुंतवणुकीवर त्यांनाही चांगला फायदा झाला होता. त्यामुळे त्यांनी काही रक्कम स्वतच्या बँक खात्यात ट्रान्स्फर करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्यांना संबंधित रक्कमेवर टॅक्स, डिपॉझिट रक्कम म्हणून तीस लाख रुपये भरण्यास सांगण्यात आले.
हेही वाचा – Khalistani Terrorist : खलिस्तानी दहशतवाद्याच्या सहकार्याला मानखुर्द येथून अटक; एनआयएची कारवाई
त्यांनी ती रक्कम भरण्यास नकार दिला होता. त्यानंतर त्यांना ऍडमिनने प्रतिसाद देणे बंद केले. फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच त्यांनी सायबर सेल पोलिसांत तक्रार केली. याप्रकरणी फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंद होताच उत्तर सायबर सेल पोलिसांनी तांत्रिक माहितीवरून साहिलला ताब्यात घेतले. फसवणुकीची काही रक्कम त्याच्या बँक खात्यात जमा झाली. ही रक्कम सायबर ठगांना दिल्यानंतर त्याला काही रक्कम कमिशन म्हणून देण्यात आली होती. तपासात ही माहिती उघडकीस येताच त्याला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला बोरिवलीतील स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.
हेही वाचा – Shyam Benegal : हा एका युगाचा अंत…मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची दिग्दर्शक बेनेगल यांना श्रद्धांजली
Edited by : Ashwini A. Bhatavdekar