घरमुंबईआंबिवलीतील बेकायदा चाळी जमीनदोस्त

आंबिवलीतील बेकायदा चाळी जमीनदोस्त

Subscribe

भूमाफियांना केडीएमसीचा धक्का

कल्याण डोंबिवली महा-नगरपालिका क्षेत्रातील ‘अ’ प्रभाग क्षेत्रात अनधिकृत बांधकाम करणार्‍या भूमाफियांची चाळी बांधून विकण्याचा सपाटा लावला असतानाच प्रभाग क्षेत्र अधिकारी सुधीर मोकल यांनी बुधवारी सायंकाळच्या सुमारास आंबिवलीतील अटाळी येथे विक्रीसाठी तयार करून ठेवलेल्या दहा खोल्या, दोन गाळे व एक पत्रा शेड कारवाईत तोडले.
गेल्या काही महिन्यांत अ प्रभाग क्षेत्रातील शहाड, वडवली, आंबिवली, अटाळी, मोहने व मांडा, टिटवाळा, बल्याणी येथे मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे उभी राहत आहेत.

ही अनधिकृत बांधकामे एक आठवड्यांमध्ये पूर्ण करून, एक खोली 7 ते 8 लाखांना विक्रीसाठी उपलब्ध करून दिली जाते. मात्र, या खोल्या बेकायदा असल्याने खोल्या घेणार्‍यांची फसवणूक होते. या बेकायदा खोल्यांच्या विक्रीसाठी एजंटही भूमाफियांकडून नेमले जातात. या अनधिकृत खोल्या विकत घेणार्‍यांना एजंट व भूमाफिया, बांधकाम व्यवसायिक बँकेचे कर्ज देखील उपलब्ध करून देत असल्याची खात्रीदायक माहिती उपलब्ध झाली आहे.

- Advertisement -

गेल्या काही महिन्यांपासून ‘अ’ प्रभागातील शासकीय जागा व कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने टाकलेल्या आरक्षित जागेवर या भूमाफियांनी चाळ्या बांधून कोट्यवधी रुपये कमविले आहेत. परिसरातील अनेक जागा या भूमाफियांनी ताब्यात घेऊन ‘अ’ प्रभाग क्षेत्रात आपल्या आईवडिलांच्या नावे नवीन नगरे स्थापित करून कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेला थेट आव्हान दिले आहे.

प्रभाग क्षेत्र अधिकारी सुधीर मोकल यांनी कारवाईचा बडगा उचलत आंबिवलीतील अटाळी येथे विक्रीसाठी तयार करून ठेवणार्‍या भूमाफिया सुरेश पाटील व त्यांचा भागीदार लहू जाधव यांच्या दहा खोल्या, दोन गाळे व एक पत्राशेड बुलडोजरने जमीनदोस्त केल्या आहेत. मात्र, भूमाफियांना बांधकामाचे चांगले पैसे मिळत असल्याने अनधिकृत बांधकामे तेजीत सुरू असून मोकल यांच्या समोर ते अनधिकृत बांधकाम रोखण्यासाठी मोठे आव्हान निर्माण झाले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -