घरमुंबईशुल्कासाठी तगादा लावणार्‍या शाळांवर कारवाई - शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड

शुल्कासाठी तगादा लावणार्‍या शाळांवर कारवाई – शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड

Subscribe

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अनेकजणांचे रोजगार धोक्यात आले आहेत. त्यामुळे शुल्क भरण्यासाठी शाळांनी सवलत देण्याचे निर्देश सरकारने दिले असतानाही अनेक शाळांनी शुल्कात वाढ केली आहे. तसेच शुल्क भरण्यासाठी पालकांच्या मागे तगादा लावला आहे. त्यामुळे पालकांना मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे अशा शाळांवर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी विद्यार्थी संघटनेला दिले आहे.

लॉकडाऊनच्या कालावधीत शिक्षण संस्थांनी विद्यार्थ्यांचे शुल्क भरण्यासाठी पालकांना सवलत द्यावी असे  महाराष्ट्र शासनाचे स्पष्ट निर्देश आहेत. राज्य शासनाचे आदेश डावलून बोरिवली पश्चिम येथील ऑर्चिड इंटरनॅशनल स्कूलसह अनेक शाळांनी शुल्क वाढ केली आहे. त्याचबरोबर काही शाळांनी शुल्क भरण्यासाठी पालकांकडे तगादा लावला असून, शुल्क न भरल्यास ऑनलाईन वर्गात बसण्यास मुलांना परवानगी देत नसल्याच्या तक्रारी युवासेनेला प्राप्त झाल्या आहेत. या तक्रारींची दखल घेत युवासेना सिनेट सदस्यांच्या शिष्टमंडळाने शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची भेट घेतली. शिष्टमंडळात आमदार विलास पोतनीस, युवासेना मुंबई विद्यापीठ सिनेट सदस्य प्रदिप सावंत, शशिकांत झोरे, शितल शेठ – देवरुखकर, राजन कोळंबेकर, महादेव जगताप व शाखाप्रमुख विपुल दारुवाले यांचा समावेश होता. यावेळी शुल्कासाठी तगादा लावणार्‍या शाळांची चौकशी करून दोषी आढळणार्‍यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -