घरमुंबईमनाई आदेशाचा भंग केल्यास कारवाई

मनाई आदेशाचा भंग केल्यास कारवाई

Subscribe

ठाणे पोलीस आयुक्तांचे आदेश

भिवंडी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आदर्श आचारसंहितेसोबतच निवडणूक कार्यक्रम देखील जाहीर झाला आहे. दोन एप्रिलपासून नामनिर्देशन अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होत आहे. त्यासाठी पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे. ठाणे पोलीस आयुक्तांनी तातडीने पोलीस उपायुक्तांसह सर्व वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांशी चर्चा करून शांतता, सुव्यवस्था चोख राहावी, कुठेही अनुचित प्रकार घडू नये त्यासाठी सज्ज राहण्याचे आदेश दिले आहेत. पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई सुरू केली असून मनाई आदेश मोडणार्‍यांवर कायदेशीर कारवाईचा इशारा दिला आहे.

निवडणुकीच्या अनुषंगाने परिसरातील 1 हजार 435 जणांवर गुन्हे प्रतिबंध कायद्यान्वये कारवाई करण्यात आली असून सुमारे 525 जणाविरोधात अजामीन पात्र वॉरंट काढण्यात आले आहे. सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाच्या चारही बाजूने 100 मीटर परिसरात कलम 144 (2) अन्वये पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांनी मनाई आदेश लागू केल्याची माहिती पोलिसांनी दिली.

- Advertisement -

मनाई आदेशाचा भंग करणार्‍या राजकीय पक्षाच्या पदाधिकारी आणि पुढार्‍यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. भिवंडी उपायुक्त परिमंडळ 2 क्षेत्रातील आतापर्यंत 3 हजार 119 परवानाधारक शस्त्रे जमा करण्यात आली असून 22 बेकायदेशीर शस्त्र जप्त करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच सुरक्षितेचा दृष्टीने भिवंडी लोकसभा परिसरात कोणत्याही पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते प्रतिनिधी यांना उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकार्‍याकडे दाखल करताना सभा, बैठक आदी कार्यक्रम घेण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. तसेच उमेदवारी अर्ज दाखल करताना उमेदवार आणि त्यांच्या समवेत केवळ चार व्यक्तींनाच निवडणूक निर्णय अधिकार्‍यांच्या कक्षामध्ये प्रवेश देण्यात येईल. तसेच कार्यालय परिसरात केवळ तीन वाहने आणण्याची परवानगी देण्यात आली आहे. या मनाई आदेशाचा भंग केल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा आयुक्तांनी दिला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -