Friday, February 26, 2021
27 C
Mumbai
घर मुंबई छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांचा विष प्राशनचा प्रयत्न, पोलिसांनी घेतलं ताब्यात

छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांचा विष प्राशनचा प्रयत्न, पोलिसांनी घेतलं ताब्यात

मंत्रालयाच्याबाहेर छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांची धडक

Related Story

- Advertisement -

मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर मराठा समाज आक्रमक झाला आहे. मराठा आरक्षणासाठी मराठा समाजाकडून आंदोलने, मोर्चे काढण्यात येत आहेत. मराठा समाजाच्या मागण्यांकडे राज्य सरकार दुर्लक्ष करत आहेत. तसेच मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण करण्यात दीरंगाईही करत आहे त्यामुळे मराठा समाज आक्रमक भूमिका घेताना दिसत आहे. मुंबईतील आझाद मैदानात मराठा विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरु ठेवले आहे. परंतु यावरही राज्य सरकार दुर्लक्ष करत असल्याचा आरोप छावा संघटनेने दिला आहे. मुंबईत छावा संघटनेचे काही पदाधिकाऱ्यांनी मंत्रालयात विष प्राशन करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

मुंबईतील मंत्रालयात छावा संघटनेच्या काही पदाधिकाऱ्यांनी मागण्या मान्य होत नसल्यामुळे आणि सरकार दुर्लक्ष करत असल्यामुळे विष प्राशन करुन आत्महत्या करण्याचा इशारा दिला होता. जालना जिल्हाधिकाऱ्यांना या प्रकरणी १० फेब्रुवारीला निवेदनही देण्यात आले होते. या निवेदनात म्हटले होते की, पुढील ५ दिवसांत मागण्या पुर्ण झाल्या नाहीत तर आम्ही मंत्रालया समोर विष प्राशन करणार करु यासाठी सर्व कार्यकर्ते मंत्रालयासमोर आले होते. परंतु वेळीच धाव घेऊन पोलीस प्रशासनाने या सगळ्यांना ताब्यात घेतले आणि अनर्थ टळला आहे. मराठ्यांना जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत छावा संघटना शांत बसणार नाही असा इशारा छावा संघटनेने दिला आहे.

- Advertisement -

मराठा आरक्षण प्रकरणी मराठा समाज पुन्हा आक्रमक भूमिका घेण्याची शक्यता आहे. मराठा समाजाने वारंवार मागण्या करुन मराठा आरक्षण प्रकरणावर काहीही तोडगा निघालेला नाही यामुळे राज्यातील मराठा समाजामध्ये राज्य सराकरविरोधात रोष निर्माण झाला आहे.


हेही वाचा: सर्वोच्च न्यायालयाच्या मुखातून सरकारच्याच ‘मन की बात’ – सामना


- Advertisement -

 

- Advertisement -