‘पोलीस कोठडीत माझा विनयभंग झाला’; केतकी चितळेचा गंभीर आरोप

actor ketaki chitale arrested over facebook post on ncp sharad pawar allegations

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविषयी सोशल मीडियावर आक्षेप पोस्ट केल्याप्रकरणातून अभिनेत्री केतकी चितळेची अखेर सुटका झाला. २२ जूनला जामीन मंजूर होताच २३ जूनला केतकी चितळेची ठाणे कारागृहातून सुटका झाली. पोलीस कोठडीतून बाहेर येताच केतकी चितळेने इंडिया टुडे या इंग्रजी वृत्तपत्राला मुलाखत दिली, या मुलाखतीत केतकी चितळेने पोलीस कोठडीत आपला विनयभंग झाल्याचा गंभीर आरोप केला आहे.

केतकीने म्हटले की, मला माझ्या घरातून बेकायदेशीरपणे अटक केली, कोणत्याही नोटीस, अटक वॉरंटशिवाय मला जेलमध्ये टाकले. मी कोणतेही बेकायदेशीर कृत्य केलं नाही. मी सत्य बोलले. त्यामुळे मी सर्व परिस्थितीचा सामना करु शकत होते. जेलमध्ये मला मारहाण झाली, माझा विनयभंग झाला, कोठडीत माझ्या अंगावर शाईच्या नावाखाली विषारी काळा रंग टाकला, असा आरोप केतकीने केला आहे.

जामीन मिळाल्याने जेलमधून बाहेर येताना माझ्या चेहऱ्यावर हास्य होते, पण मी जामीनावर बाहेर आहे, अद्याप लढाई सुरु आहे, आपल्याविरोधात २२ गुन्हे दाखल असून त्यातील एका गुन्ह्यात मला जामीन मिळाला असं केतकी म्हणाली.

वादग्रस्त पोस्टबाबत केतकी म्हणाली की, त्या पोस्टमध्ये केवळ पवार असा उल्लेख होता, मात्र लोकांनी त्याचा संबंध शरद पवार यांच्याशी लावला. पोस्टमध्ये मी कोणाचाही अपमान केला नव्हता. लोकचं शरद पवार तसेच आहेत असा सांगण्याचा प्रयत्न करत आहेत का? माझ्याविरोधात तक्रार करणाऱ्या राष्ट्रवादी आणि इतर लोकांना विचारायचं आहे. अस केतकी म्हणाली.

काय होत नक्की प्रकरण

आपल्या वादग्रस्त आणि बेधडक वक्तव्यांमुळे केतकी चितळेनं ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याविषयी अतिशय खालच्या भाषेत फेसबुकवर एक पोस्ट केली होती. या पोस्टवरून तिच्याविरोधात कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. केतकी चितळेने ही पोस्ट करुन समाजात द्वेषाची भावना आणि तेढ निर्माण करण्याचे कृत्य केले होते. त्यानुसार कळवा पोलीस ठाण्यात केतकीविरोधात कलम 505(2), 500, 501, 153 (अ) नुसार गुन्हा दाखल झाला होता. याप्रकरणी प्राथमिक पोलीस कोठडीनंतर ठाणे सत्र न्यायालयाने केतकीला न्यायालयीन कोठडी सुनावली होती. कळवा पोलीस ठाण्यातील हा गुन्हा रद्द करण्यात यावा, अशी मागणी करत केतकीने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. पोलिसांनी हा गुन्हा राजकीय सुडबुद्धीने दाखल केल्याचा दावाही केतकीने आपल्या याचिकेतून केला होता. मात्र या गुन्ह्यातून केतकीला जामीन मंजुर झाला, परंतु ठाण्यापाठोपाठ केतकीविरोधात राज्यातील विविध ठिकाणी गुन्हा दाखल आहे.


आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट प्रकरणी केतकी चितळेला जामीन मंजूर