घरताज्या घडामोडीPornographic Films Scandal: राज कुंद्रा यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

Pornographic Films Scandal: राज कुंद्रा यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

Subscribe

पॉर्न फिल्म प्रकरणात कोर्टाने अभिनेत्री शिल्पा शेट्टी यांचे पती आणि उद्योगपती राज कुंद्रा यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. राज कुंद्रा यांना १९ जुलैच्या रात्री उशिरा गुन्हे शाखेने अटक केली होती. मुंबई पोलिसांनी राज यांच्यासाठी ७ दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती, मात्र कोर्टाने ही विनंती मान्य केली नाही. यापूर्वी कोर्टाने राज कुंद्रा यांना २७ जुलै पर्यंत पोलीस कोठडी सुनावली जाईल, असा आदेश दिला होता. यानंतर मुंबई पोलिसांची टीमही राज कुंद्रा यांच्यासह त्यांच्या घरी पोहोचली आणि घराची झडती घेतली. या प्रकरणात राज यांची पत्नी आणि बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिची देखील चौकशी करण्यात आली.

- Advertisement -

 

असे आहे प्रकरण

राज कुंद्रा यांना १९ जुलै रोजी अटक करण्यात आली होती. राज कुंद्रा यांच्यावर अश्लील सामग्री तयार करण्याचा आणि प्रसार केल्याचा आरोप आहे. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने अश्लील चित्रपट बनवून ते अ‍ॅपवर अपलोड केल्याबद्दल फेब्रुवारी महिन्यात पत्रकार परिषदेत खुलासा केला होता. पोलिसांनी या महिन्यात पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी पत्रकार परिषदेत त्यांनी असे म्हटले की, राज कुंद्रा हा मुख्य सुत्रधार असल्याचे आम्हाला तपासणीत आढळून आले आहे. तसेच त्यांच्याविरूद्ध पुरेसे पुरावे मिळाले आहेत.

- Advertisement -

राज कुंद्रा यांचे माजी सहाय्यक उमेश कामत यांनी त्यांचे नाव सांगितले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राज कुंद्रा यांच्या कार्यालयातील अश्लिल क्लिप्स आणि ईमेल यांचा समावेश असलेला पुरावा हा “मुख्य सूत्रधार” असल्याचे दिसून आले आहे. राज कुंद्राच्या मुंबई कार्यालयातून अश्लील सामग्री तयार केली जात होती. “हॉटशॉट्स” अ‍ॅपवर अश्लील सामग्री तयार करणे आणि प्रसारित करण्यात देखील कुंद्रा यांचा सहभाग असल्याचे पोलिसांनी सांगितले.


Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -