घरट्रेंडिंग'संतांची, वीरांची नाही ही नराधमांची भूमी' पालघर घटनेवर सुमीत राघवन संतापला!

‘संतांची, वीरांची नाही ही नराधमांची भूमी’ पालघर घटनेवर सुमीत राघवन संतापला!

Subscribe

पालघर जिल्ह्यात जमावानं तीन प्रवाशांना चोर समजून दगडानं ठेचून हत्या केल्याच्या घटनेवर आता कलाकारही व्यक्त होऊ लागले आहेत. अभिनेता सुमीत राघवनने या घटनेवर संताप व्यक्त केला आहे.  

नुकतीच पालघरमध्ये एक संतापजनक घटना घडली. पालघरमध्ये घडलेल्या मॉब ब्लिचींगच्या घटनेवर चहूबाजूने टीका होत आहे. पालघर जिल्ह्यात जमावानं तीन प्रवाशांना चोर समजून दगडानं ठेचून हत्या केल्याच्या घटनेवर आता कलाकारही व्यक्त होऊ लागले आहेत. अभिनेता सुमीत राघवनने या घटनेवर संताप व्यक्त केला आहे.

- Advertisement -

सुमीत राघवनने ट्वीटरवर प्रतिक्रीया दिली आहे. सुमीतने ट्वीटरवर लिहिले आहे की, ‘मी सुन्न झालोय.भीषण,भीतिदायक,लाजिरवाणं आहे जे घडलं. “संतांची,वीरांची भूमी” असं टाळूया आपण ह्यापुढे बोलायचं. “नराधमांची भूमी” जास्त योग्य आहे. ही घटना महाराष्ट्राच्या प्रतिमेवर लागलेला काळा डाग आहे.’ @OfficeofUT @AUThackeray @AnilDeshmukhNCP लाज वाटली पाहिजे.  या ट्वीटमध्ये सुमीतने उद्धव ठाकरे, राज्य पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, गृहमंत्री अनिल देशमुख आणि पालघर पोलीस यांना टॅग केलं आहे.

- Advertisement -

एवढंच नाही तर सुमीतने या आधीही ३ ट्वीट केले आहे. पहिल्या ट्वीटमध्ये तो म्हणाला की, मी तो व्हीडिओ बघितला नसता तर बरं झालं असतं. आता ही दृश्य माझ्यासमोरून जात नाहीयेत. एखाद्या म्हाताऱ्या माणसाला जमाव दगडं मारून हत्या कशी करू शकतं? म्हाताऱ्याचं संरक्षण करण्याऐवजी पोलीस त्यांच्यापासूनच लांब पळत होते. या ट्वीटनंतर सुमीतने आणखी एक ट्वीट केलं आहे. या ट्वीटमध्ये लिहीलं आहे की, ‘जमाव इतका क्रूर आणि निर्दयी कसा असू शकतो. जमावातील एकानेही हे सर्व थांबवण्याचा प्रयत्न कसा केला नाही… मला वाटतंय की कोणी तरी केलाच असेल.. बरोबर ना? मलला खरंच कळत नाहीये या सगळ्याकडे मी कशापद्धतीने पाहू.. जरा थांबूया.. विचार करूया आणि स्वतःलाच प्रश्न विचारूया.. जे झालं ते योग्य होतं का?

काय घडलं नेमकं?

गुरुवारी रात्री दहाच्या सुमारास दाभाडी-खानवेल जंगलातील मार्गावर नाशिककडून येणार्‍या एका कारला दादरा नगर हवेली केंद्रशासित प्रदेशाच्या सीमेजवळ गडचिंचले गावात गावकर्‍यांनी रोखले. या प्रवाशांकडे विचारपूस केल्यानंतर त्यांनी दिलेली उत्तरे समाधानकारक न वाटल्याने गावकर्‍यांनी दगड आणि व लाठी-काठ्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यांची गाडीही उलटी करून टाकली. बेदम मारहाण झाल्याने जखमी झालेले गाडीतील तीन जण जागीच मरण पावले. यावेळी सातशेहून अधिकचा जमाव जमला होता. पोलिसांना याची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेतली. पण, संतापलेल्या जमावाने पोलिसांवरही हल्ला केला. यात पोलिसांच्या गाड्यांचे नुकसान झाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -