१८ वर्षापासून वाट पाहिली पण सोनियांनी शब्द पाळला नाही, उमेदवारी न मिळाल्याने अभिनेत्री नगमा नाराज

राज्यसभेची निवडणूक 10 जून रोजी होणार आहे. राज्यसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने रविवारी 10 उमेदवारांची घोषणा केली. उमेदवारांच्या घोषणेनंतर काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते पवन खेरा यांनीही नाराजी व्यक्त केली. त्यांनी ट्विट करून कदाचित माझ्या तपश्चर्येत काही कमतरता असेल असे म्हटले आहे.

राज्यसभा निवडणुकीसाठी (Rajya Sabha elections) काँग्रेसने (Congress ) 10 उमेदवार जाहीर केल्यानंतर पक्षांतर्गत असंतोष उफाळून आला आहे. उमेदवारी न मिळाल्याने अनेक नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. अभिनेत्री आणि महिला काँग्रेसच्या सरचिटणीस नगमा ( Actress Nagma) यांनी सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांनी १८ वर्षांपूर्वी आपल्याला दिलेला शब्द पाळला नाही, असा आरोप करत आपली नाराजी दर्शवली आहे.

तपस्या कमी पडली

नगमा यांनी ट्टिवट ( tweet) करत पक्षाच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली. नगमा यांनी ट्विटमध्ये म्हटले की, आमच्या काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी 2003-04 मध्ये जेव्हा मी पक्षात प्रवेश केला तेव्हा मला राज्यसभेवर पाठवण्याचे आश्वासन दिले होते. त्यावेळी आम्ही सत्तेत नव्हतो. यानंतर 18 वर्षे झाली आणि मला राज्यसभेवर पाठवण्याची संधी न मिळाल्याने इम्रानला संधी मिळाली. मी विचारू इच्छितो की मी कमी पात्र आहे का?  नगमा यांनी काँग्रेसचे अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष आणि कवी इम्रान प्रतापगढी ( Imran Pratapgadhi) यांना महाराष्ट्रातून राज्यसभेचे उमेदवार देण्यावरही  प्रश्न उपस्थित केला आहे. तसेच इमरान भाई यांच्यापुढे आपली १८ वर्षांची तपस्या कमी पडली असेही त्यांनी म्हटले आहे.

 10 जूनला निवडणूक

राज्यसभेची निवडणूक 10 जून रोजी होणार आहे. राज्यसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने रविवारी 10 उमेदवारांची घोषणा केली. यामध्ये तामिळनाडूमधून पी. चिदंबरम, कर्नाटकातून जयराम रमेश, हरियाणामधून अजय माकन आणि राजस्थानमधून रणदीप सुरजेवाला, राजस्थानमधून मुकुल वासनिक आणि प्रमोद तिवारी, मध्य प्रदेशातून विवेक तंखा, छत्तीसगडमधून राजीव शुक्ला आणि रंजित रंजन आणि महाराष्ट्रातून इम्रान प्रतापगढी यांना उमेदवारी दिली आहे.

पवन खेराही नाराज 

उमेदवारांच्या घोषणेनंतर काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते पवन खेरा यांनीही नाराजी व्यक्त केली. त्यांनी ट्विट करून कदाचित माझ्या तपश्चर्येत काही कमतरता असेल असे म्हटले आहे. खेडा यांचे ट्विट रिट्विट करताना नगमा म्हणाली की, आमची १८ वर्षांची तपश्चर्या इम्रान भाई यांच्यासमोर कमी पडली. इम्रान प्रतापगडी हे उत्तर प्रदेशातील 34 वर्षीय मुस्लिम तरुण चेहरा आहे. उर्दू कवी असलेले इम्रान हे कॉंग्रेसच्या अल्पसंख्यांक विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत.