घरमुंबई'बेटी बचाओ’चा नारा देणार्‍यांना हे शोभत नाही - उर्मिला मातोंडकर

‘बेटी बचाओ’चा नारा देणार्‍यांना हे शोभत नाही – उर्मिला मातोंडकर

Subscribe

एखादी व्यक्तीचे आव्हान तेव्हा वाढते, जेव्हा त्यांनी दैदिप्यमान काम केलेले असेल. पण तसे काम शेट्टी यांनी केलेले दिसत नसल्याची टीका उर्मिला मातोंडकरने केली आहे.

भाजपकडून ‘बेटी बचाओ’चा नारा दिला जातो. त्यामुळे त्यांच्याकडून महिलांचा सन्मान व्हायला हवा. परंतु त्याच पक्षाकडून जर महिलांचा सन्मान राखला जात नसेल त्यांच्याबद्दल काय बोलावे, अशा शब्दांत उत्तर मुंबईच्या काँग्रेस उमेदवार यांनी गोपाळ शेट्टींचा समाचार घेतला.

उर्मिलामुळे शेट्टीची अवस्था बिकट

लोकसभा निवडणुकीमध्ये उत्तर मुंबईत काँग्रेसच्या उमेदवार उर्मिला मातोंडकर आणि भाजपचे उमेदवार गोपाळ शेट्टी यांच्यात लढत आहे. परंतु उर्मिलाच्या वाढत्या प्रसिध्दीपुढे शेट्टीची अवस्था बिकट झाली आहे. त्यामुळे शेट्टी बिथरले असून त्यांनी बेलगाम वक्तव्ये करायला लागले आहे. शेट्टी यांनी काही दिवसांपूर्वी ट्विटरवरून एक पोस्ट केली होती. त्यामध्ये त्यांनी, उर्मिलाजी यांना राजकारणात आणण्यात आले आहे, ते त्यांच्या चेहर्‍याकडे पाहूनच. यामध्ये कोणाला वाईट वाटण्याचे काहीच कारण नाही. त्या एका राजकीय कुटुंबातून आल्या आहेत. त्यांना राजकारणाची चांगली समज आहे. मात्र, त्यांनी निवडलेला पक्ष खराब असल्याची टीका शेट्टी यांनी केली होती.

- Advertisement -

गोपाळ शेट्टींची कामं दिसत नाहीत

शेट्टी यांच्या या विधानाचा उर्मिलाने समाचार घेतला आहे. आपण वैचारिक पातळीवर ही निवडणूक लढवणार, असे शेट्टी यांनी जाहीर केले. परंतु आता दररोज एक एक विधान आपल्या विरोधात केले जात आहे. हे सर्व कुठून येते हेच मला कळत नाही. बेटी बचाओचा नारा देणार्‍या पक्षाने तरी महिलांचा सन्मान करायला हवा, अशा शब्दात उर्मिलाने शेट्टी यांना शालजोडीतले मारले. एखादी व्यक्तीचे आव्हान तेव्हा वाढते, जेव्हा त्यांनी दैदिप्यमान काम केलेले असेल. पण तसे काम शेट्टी यांनी केलेले दिसत नाही. मी आजही झोपडपट्टी परिसरांमध्ये जास्त फिरतेय. कारण झोपडपट्टी भागांतील लोकांचे प्रश्न मोठे आहेत. त्यांच्या केबलवाहिन्यांपासून ते सगळेच प्रश्न इथे आहेत. या मतदार संघात कामे कुठेच झालेली नाही. त्यामुळे शेट्टींचे आव्हान आपल्यासमोर नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -