Thursday, July 22, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर मुंबई Mumbai Airport : अदानीने मुंबई विमानतळ ताब्यात घेताच मुख्यालय अहमदाबादला हलवले

Mumbai Airport : अदानीने मुंबई विमानतळ ताब्यात घेताच मुख्यालय अहमदाबादला हलवले

Related Story

- Advertisement -

मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाचा ताबा अदानीने घेताच आता कंपनीचे मुख्यालय गुजरातमधील अहमदाबादमध्ये हलवले आहे. त्यामुळे विमानतळ मुंबईत मात्र त्याचे मुख्यालय गुजरातच्या अहमदाबादमध्ये असे काहीसे चित्र निर्माण झाले आहे. अदानी उद्योग समुह अतिशय वेगानं प्रगती करत आहे. यातच काही दिवसांपूर्वी देशातील सर्वात मोठे मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळ अदानी समुहाने विकत घेतले. त्यामुळे मुंबई विमानतळाचा ताबा आता जीव्हीकेकडून अदानी कंपनीकडे गेला आहे. अदानी समूहाने गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये मुंबई विमानतळावरील जीव्हीके समूहाता अधिकार संपादन करण्याची घोषणा केली होती. यात आता नवी मुंबई विमानतळाचा ताबाही अदानी समुहाकडे गेला आहे. अदानीच्या या निर्णयामुळे मुंबईतील सर्वात मोठी कंपनी मुंबईतून अहमदाबादला शिफ्ट झाली आहे.

या निर्णयानंतर अदानीने जाहीर केले की, कंपनीच्या कामात सुसूत्रता आणि सुलभता यावी यासाठी मुख्यालय हे मुंबईतून अहमदाबादला शिफ्ट करण्यात आल्यााची प्रतिक्रिया देण्यात आली आहे.

मुंबई विमानतळावर रंगला रास गरबा

- Advertisement -

मुंबई विमानतळाचा ताबा अदानी कंपनीकडे जाताच सोमवारी दांडियाच्या गाण्यावर प्लॅशमॉबवर रंगला. या प्लॅशमॉबवरही टीका करण्यात आली. तसेच या निर्णयावरून केंद्राच्या कामकाजावर टीका करण्यात आली. अदानी उद्योग समूहाकडे मुंबईसह देशातील प्रमुख लखनऊ, जयपूर, गुवाहाटी, अहमदाबाद, तिरुवनंतपुरम आणि मंगळुरु अशा सहा विमानतळांचा ताबा आहे. अदानी एअरपोर्ट होल्डिंग्स लिमिटेड ही भारताची सर्वात मोठी विमानतळ पायाभूत सुविधा कंपनी आहे, जी विमानतळांवर येणारे २५ टक्के आणि भारताच्या विमान वाहतुकीच्या ३३ टक्के नियंत्रणाखाली आहे.


 

- Advertisement -