घरमुंबईउपनगरात अदाणीला साथ दुबईच्या कंपनीची

उपनगरात अदाणीला साथ दुबईच्या कंपनीची

Subscribe

वीज पुरवठादार कंपनीमध्ये समभागधारकात भर

मुंबई उपनगरात आता आणखी अदाणी इलेक्ट्रिसिटी मुंबई लिमिटेडच्या कारभारात आणखी एका कंपनीची भर पडणार आहे. अदाणी इलेक्ट्रिसिटी मुंबई लिमिटेडच्या वीज वितरण परवान्याअंतर्गतचे अदाणी ट्रान्समिशन लिमिटेड (एटीएल)चे समभाग विकण्यासाठी आता (एईएमएल)ने राज्य वीज नियामक आयोगाकडे धाव घेतली आहे. वीज कायद्यान्वये हा परवाना दिला असल्यानेच जनसुनावणीद्वारेच ही प्रक्रिया पार पडणार आहे. दुबईच्या कतार होल्डिंग एलएलसी या कंपनीने एटीएलकडून २५ टक्के समभाग भांडवल हस्तगत करण्यासाठी करार केला आहे. एईएमएलच्या भागधारक रचनेतील बदल करण्यासाठी जनसुनावणी आयोजित केली आहे.

वीज कायद्यान्वये वीज वितरण क्षेत्रातील कंपनीला ठराविक वर्षांचा परवाना देण्यात येतो. त्यामुळेच राज्य वीज नियामक आयोगाकडून कायद्यान्वये आधारित जोपर्यंत परवानगी मिळत नाही तोवर या करारासाठी परवानगी मिळणार नाही. म्हणूनच एईएमएलने आयोगाकडे या परवानगीसाठी धाव घेतली आहे. मूळ परवानाधारक कंपनीला कोणतेही समभाग विकताना राज्य वीज नियामक आयोगाची परवानगी घेणे कायद्यान्वये आवश्यक आहे. तसेच त्यासाठी वीज ग्राहकांच्या सूचना आणि हरकती जनसुनावणीच्या माध्यमातून नोंदवून घेणे हे आयोगाच्या अखत्यारीतील बाब आहे. याआधीच्या रिलायन्स एनर्जी आणि एईएमएल कराराअंतर्गतही राज्य वीज नियामक आयोगाने जनसुनावणीची प्रक्रिया राबवली होती.

- Advertisement -

वीजदरांवर परिणाम नाही
नवीन करारामुळे एईएमएलसोबतच कतार होल्डिंग एलएलसीचे व्यवस्थापकीय नियंत्रण असतानाच ही कंपनी समभागधारक राहणार आहे. पण या व्यवहारामुळे वीज दरांवर कोणताही परिणाम होणार नाही असे एईएमएलने स्पष्ट केले आहे. उपनगरातील वीज ग्राहकांना येत्या २० जानेवारीपर्यंत याबाबतच्या सूचना आणि हरकती दाखल करता येणार आहेत. तर राज्य वीज नियामक आयोगाने या प्रकरणात येत्या २८ जानेवारीला जनसुनावणी आयोजित केली आहे.

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -