Tuesday, September 28, 2021
27 C
Mumbai
घर क्राइम वीजचोरीसाठी सिद्धार्थ कॉलनीतील १२ ग्राहकांविरोधात FIR दाखल

वीजचोरीसाठी सिद्धार्थ कॉलनीतील १२ ग्राहकांविरोधात FIR दाखल

Related Story

- Advertisement -

चेंबूरच्या सिद्धार्थ कॉलनी येथे गेल्या १२ महिन्यांपासून सातत्याने विजेची चोरी करणाऱ्या १२ ग्राहकांविरोधात वीज कायदा २००३ च्या अनुच्छेद १३५ आणि १५० न्वये चेंबूर पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. एईएमएलच्या चेंबूर विभागाने ही वीजचोरी विरोधातील मोहीम पोलिसांच्या मदतीने राबवली.

वीजचोरी करणाऱ्या ग्राहकांचे मीटर वीजबिल भरणा न केल्याने याआधीच काढून टाकण्यात आले होते. या ग्राहकांकडून मुख्य वीज पुरवठ्याच्या ठिकाणापासून थेट पद्धतीने विजेचा पुरवठा घरापर्यंत सुरू असल्याचे एईएमएलच्या पथकाने केलेल्या पाहणी दरम्यान आढळले. पथकाच्या मोहिमेदरम्यान या वीज ग्राहकांनी ३३ हजार ५४१ युनिटची सुमारे ४ लाख ८६ हजार ६३५ रूपयांची विजेची चोरी केल्याचे आढळले.

- Advertisement -

सिद्धार्थ कॉलनी येथे अनेक दिवसांपासून थकबाकीदार असलेल्या वीज ग्राहकांविरोधात एईएमएलने विशेष मोहीम राबवत ही धडक कारवाई केली आहे. सिद्धार्थ नगर येथे गेल्या दोन वर्षात या थकबाकीदार वीज ग्राहकांकडून सुमारे अडीच कोटी रूपयांची थकबाकी शिल्लक आहे.

वीजचोरी शोध मोहिमेबाबत एईएमएलचे प्रवक्ते म्हणाले, ‘’आम्ही सिद्धार्थ कॉलनीतील काही वीज ग्राहकांचा विजेचा पुरवठा थकबाकीमुळे खंडित केला होता. या कारवाईनंतरही या वीज ग्राहकांकडून विजेची चोरी होत असल्याचे आढळले. अशा ग्राहकांमुळेच नियमित वीजबिल भरणा करणाऱ्या ग्राहकांवर अनावश्यक भार येतो. त्यामुळेच आम्ही आगामी काळतही अशा वीजचोरी करणाऱ्या ग्राहकांविरोधातील धडक मोहीम राबवून वीजचोरी प्रकरणात गुन्हे दाखल करणार आहोत. ‘’
वीजचोरीमुळे यंत्रणेवर अतिरिक्त ताण येत असतो. त्याचा परिणाम हा वीज वाहिन्यांच्या देखभाल दुरूस्तीवरही होतो. कारण अनेकदा या यंत्रणेवरील ताणामुळे केबल आणि ट्रान्सफॉर्मरमध्ये बिघाडाचे प्रकार घडतात. परिणाम हा अतिरिक्त ताण देखभाल दुरूस्तीच्या खर्चाच्या रूपाने वाढतो असेही एईएमएलच्या प्रवक्त्यांनी स्पष्ट केले.


- Advertisement -

 

- Advertisement -