Eco friendly bappa Competition
घर ताज्या घडामोडी अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानींनी घेतली राज ठाकरेंची भेट

अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानींनी घेतली राज ठाकरेंची भेट

Subscribe

अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. राज ठाकरेंच्या ‘शिवतीर्थ’ निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली.

अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. राज ठाकरेंच्या ‘शिवतीर्थ’ निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. या भेटीत अनेक विषयांवर चर्चा झाल्याचे बोलले जात आहे.

- Advertisement -

महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेण्यापूर्वी उद्योगपती गौतम अदानी यांनी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना उद्धव बाळासहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेटी घेतली होती. त्यावेळी जवळपास एक तास दोघांमध्ये चर्चा सुरु होती. गौतम अदानी यांनी उद्धव ठाकरेंच्या निवासस्थानी ‘मातोश्री’वर जाऊन त्यांची भेट घेतली होती. याशिवाय, गौतम अदानी यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीही मुंबईतील शासकीय निवासस्थानी भेट घेतली होती. त्यावेळी अदानी आणि शिंदे यांच्यात जवळपास ४५ मिनिटे बैठक चालली होती.

दरम्यान, प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यात मैत्रीत्वाचे संबंध आहेत, म्हणूनच गौतम अदानी यांचा व्यवसाय सुरळीत सुरू आहे, असा दावा केला जातो. मात्र, गौताम अदानी यांनी याबाबत महत्त्वाचं विधान केलं आहे. भाजपाचं राज्य नसलेल्या राज्यातही माझा व्यवसाय आहे, असं गौतम अदानी (Gautam Adani) म्हणाले. प्रत्येक राज्यात जास्तीत जास्त गुंतवणूक करणे हे आमचं उद्दीष्ट्य आहे. आम्हाला या एका गोष्टीचा आनंद आहे की देशातील २२ राज्यांत अदानी समूह काम करत आहे आणि त्यातील काही राज्यात भाजपाचं सरकार नाही, असं गौतम अदानी म्हणाले. आप की अदालत या कार्यक्रमात ते बोलत होते.


- Advertisement -

हेही वाचा – विलेपार्लेतील महिलेवर अहमदाबादेत सामूहिक बलात्कार; दोन जणांना अटक

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -