घरताज्या घडामोडीवाढीव वीजबिलावर मी शरद पवारांना फोन केला, पाच दिवसांनी अदाणी सिल्वर ओकवर...

वाढीव वीजबिलावर मी शरद पवारांना फोन केला, पाच दिवसांनी अदाणी सिल्वर ओकवर पोहचल्याचे कळालं – राज ठाकरे

Subscribe

वीजबिल वाढीच्या विषयावर सर्वात पहिल्यांदा आंदोलन आमच्या पक्षाने केले आहे. आमच्या मुलांवर गुन्हे, केसेस दाखल करण्यात आले आहेत. भाजप पहिल्यांदा आंदोलन केले काय सांगतय ? तुमच्या कंपन्यांचा कोरोनातला तोटा भरून काढण्यासाठी तुम्ही नागरिकांना पिळणार, मंत्री वीजबिलमाफीच आंदोलन देऊन घुमजाव करणार, तर सर्वसामान्यांच कस होईल, असा प्रश्न महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विचारला आहे. नवी मुंबईतील न्यायालयीन सुनावणीत टोल विषयावर जामीन मिळाल्यावर प्रसारमाध्यमांशी ते बोलत होते. वाढीव वीजबिलाच्या विषयावर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतल्यावर शरद पवारांशी बोलून घ्या असे त्यांनी सांगितले. शरद पवारांशी बोलल्यावर त्यांनी टाटा, अदाणी, एमएसईबी या प्रत्येक कंपनीच्या नावे पत्र लिहा असे सांगितले. पण पाच सहा दिवसांनी कळाल की अदाणी पवारांच्या घरी येऊन गेले. वीज कंपन्यांसोबत राज्य सरकारची लेनदेन झाल्याशिवाय ऊर्जामंत्री घुमजाव करणार नाही. लॉकडाऊनमध्ये सगळच बंद होतं, आता राज्य सरकार ओरबयाडच काम करत असल्याची टीका राज ठाकरे यांनी केली.

वीजबिल वाढीव द्यायचे आणि परीक्षा काळात वीज कनेक्शन कापायचे हा निर्दयीपणा असल्याची टीका राज ठाकरे यांनी केली. सरकारने सगळ्या कंपन्यांना पाठीशी घातल आहे, सरकारचे या कंपन्यांसोबत काही तरी घेण्यादेण्याचे व्यवहार झाल्याशिवाय हे शक्य नसल्याचे ते म्हणाले. सरकारची दुकान लॉकडाऊनमध्ये बंद होती, त्यामुळेच आता ओरबडण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. वीज कंपन्यांकडून काहीतरी फायदा मिळाल्याशिवाय सरकार असे वागणार नाही, असेही ते म्हणाले. राज्य सरकारने सर्वसामान्यांचा विचार करून वीजदरवाढीवर निर्णय घ्यायला हवा होता असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

- Advertisement -

लतादीदी, सचिन मोठी लोक

लता, सचिन ही खूपच साधी माणस आहेत. नव्या कृषी कायद्याविरोधात शेतकरी आंदोलनाला समर्थन देणाऱ्या परदेशी पॉप सिंगरच्या ट्विटनंतर केंद्र सरकारने या साध्या सेलिब्रिटींकडून अशा गोष्टी करून घ्यायला नको होत्या. लतादिदी, सचिन तेंडुलकर ही सगळी मोठी लोक आहेत. या लोकांना ट्विट करायला सांगण अशा गोष्टीतून सरकारने या लोकांची प्रतिष्ठा अशा प्रकारच्या गोष्टीत पणाला लावू नये असेही ते म्हणाले. त्यांच्या ट्विटनंतर आता त्यांच्यावर वैयक्तिक पातळीवर टीका होत असल्याचेही ते म्हणाले. हे प्रकरण अगदीच अक्षय कुमारपर्यंत मर्यादित ठेवायला हव होत असाही टोला त्यांनी लगावला.

निवडणुका आल्या की नामांतराचा विषय येतो

भाजप सेनेची सत्ता केंद्रात राज्यातही होती. सत्ता होती तेव्हा औरंगाबादच संभाजीनगर असे नामांतर का नाही झाल ? आता निवडणुकांच्या तोंडावर कसल राजकारण करता असाही सवाल त्यांनी केला. देशात इतर अनेक शहरांची नावे, रस्त्यांची नावे बदलली. केंद्रात राज्यात सत्ता होती, त्यावेळी का नामांतराची आठवण आली नाही याचे भाजप, सेनेने उत्तर द्यावे असेही ते म्हणाले. निवडणूकीच्या तोंडावर विषय आणायचा. सत्ता असतानाना थांबवणार कोणच नव्हत, तेव्हा हे विषय येत नाही, मग आत्ताच कुठे आलात असेही ते म्हणाले. संभाजीनगरचे नागरिक सुजाण, ते योग्य निर्णय घेतील असेही त्यांनी सांगितले.

- Advertisement -

केंद्राने आणि राज्य सरकारने बसून प्रश्न सोडवावा

रिहानावर बोलताना राज ठाकरे म्हणाले की शेतकरी आंदोलनावर ती ट्विट करायच्या आधी तुमहाला तरी माहित होत का ? तुम्हाला उत्तर द्यायची काय गरज होती असाही सवाल त्यांनी केंद्राला केला. अगली बार ट्रम्प सरकार अशीही भाषण करायची गरज नव्हती असाही टोला त्यांनी लगावला. पंतप्रधानांनी मन की बातमध्ये बोलतात. पण आता शेतकरी विषयात पंतप्रधानांनी पुढाकार घेऊन प्रश्न मिटवावा असे ते म्हणाले. पंतप्रधानांनी लक्ष घालण गरजेचे आहे, आणखी किती दिवस हे आंदोलन चिघळवणार असा सवाल राज ठाकरे यांनी केला. शेतकरी अशाच पद्धतीने किती दिवस थंडी वाऱ्यात राहणार ? कृषी धोरणबाबत राज्याला, केंद्राला विश्वासात घेऊन राज्य केंद्राने बसून प्रश्न सोडवावा, असेही ते म्हणाले. शेतकऱ्यांसाठी आणलेला कायदा हा चांगला असला तरीही तो एक दोन जणांच्या फायद्याचा होऊ नये असे ते म्हणाले. चीन, पाकिस्तानच संकट आहे, की शेतकऱ्यांवर संकट आहे. शेतकऱ्यांविरोधात इतका बंदोबस्त हा चीन, पाकिस्तानच्या बॉर्डरवरही पाहिला नाही असे ते म्हणाले. कायद्यात त्रुटी असू शकतात. केंद्राने राज्यांशी चर्चा करून अंमलबजावणी केली पाहिजे असे ते म्हणाले.

फडणवीसांचे जादुचे प्रयोग दिसतीलच

राज्यात सत्ता बदलाच्या प्रश्नावर फडणवीसांचे जादुचे प्रयोग हे दिसतीलच. ते कशाप्रकारे हे जादुचे प्रयोग करतात हे पहावे लागेल असे ते म्हणाले. राज्यात भाजपकडून सत्ता बदलासाठी कोणत्याही पक्षाची गरज भासणार नाही, या विषयावर बोलताना राज ठाकरे यांनी हे उत्तर दिले. देवेंद्र फडणवीस हे वारंवार अशा जादूच्या प्रयोगाबाबत बोलतात, त्यामुळे त्या जादुच्या प्रयोगांना पहाव लागेल असेही ते म्हणाले.

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -