घरताज्या घडामोडी'द' दारूचा नव्हे तर 'द' दुधाचा; थर्टीफर्स्ट निमित्ताने अनोखी मोहीम

‘द’ दारूचा नव्हे तर ‘द’ दुधाचा; थर्टीफर्स्ट निमित्ताने अनोखी मोहीम

Subscribe

कल्याण, भिवंडीत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्यावतीने थर्टीफर्स्ट निमित्ताने दूधाचे वाटप करण्यात आले. तरुण पिढीला व्यसनापासून दूर लोटण्यासाठी ही मोहीम राबविण्यात आली होती.

थर्टीफर्स्टला सेलिब्रेशनच्या नावाखाली तरुण पिढी दारू पिऊन सरत्या वर्षाला निरोप देत नववर्षाचे स्वागत करीत असतात. तरुण पिढीला दारूच्या व्यसनाधीनतेपासून दूर नेण्यासाठी महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्यावतीने कल्याण भिवंडीत दुधाचे वाटप करीत जनजागृती मोहीम राबविली. गेल्या काही वर्षांपासून सरत्या वर्षाला दारू पिऊनच निरोप द्यायचा, असा प्रघात पडत चाललेला दिसतो. तरुणाई मोठ्या प्रमाणावर या चंगळवादी चक्रात ओढली जातेय. गेल्या काही वर्षांमध्ये ३१ डिसेंबरला ‘सेलिब्रेशन’च्या नावाखाली तरुण पिढीमध्ये मोठ्या प्रमाणात व्यसन वाढताना दिसत आहे.

अनोख्या संकल्पनेचा शहरातील नागरिकांकडून स्वागत

अनेक तरुण-तरुणी ३१ डिसेंबरला व्यसनाचा पहिला अनुभव घेतात आणि पुढे जाऊन व्यसनाच्या अधीन होतात. त्यामुळे व्यसनापासून तरुण पिढीला दूर लोटण्यासाठी महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समिती कल्याण शाखेच्यावतीने कल्याण स्टेशन बाहेरील दिपक हॉटेल समोर मसाला दुधाचे वाटप करण्यात आले. दारूचे दुष्परिणाम, व्यसनामुळे संसाराची हानी या विषयांवर जनजागृती करण्यात आली. तसेच भिवंडी शहरातही अंनिसने ‘द’ दारूचा नव्हे तर ‘द’ दुधाचा हा अनोखा संकल्प करून अंधश्रद्धा निर्मूलन संस्थेच्या वतीने मंगळवारी भिवंडीतील छ. शिवाजी महाराज चौक येथे ‘चला व्यसनाला बदनाम करूया’ या अनोख्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. याप्रसंगी अंनिस कार्यकर्त्यांनी नागरिकांना दूध वाटप करून व्यसनाधीनतेपासून दूर राहण्याचे आवाहन केले. अंनिसच्या या अनोख्या संकल्पनेचा शहरातील नागरिकांकडून स्वागत करण्यात आले. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती दरवर्षी ३१ डिसेंबरला दारू नको दूध प्या हा उपक्रम राबविते.

- Advertisement -

‘चला व्यसनाला बदनाम करूया’

३१ डिसेंबरला सेलिब्रेशनच्या नावाखाली तरुण पिढीमध्ये मोठ्या प्रमाणात व्यसनाधीनता वाढताना दिसत आहे. तरुण व्यसनाधिन बनतात, या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र अंनिसचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या संकल्पकतेने साकारलेली ‘चला व्यसनाला बदनाम करूया’ ही व्यसन विरोधी मोहीम दरवर्षी राज्यभर ठिकठिकाणी राबविली जाते.


हेही वाचा – वसईत अपहरण केलेला कुत्रा सापडला

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -