घरताज्या घडामोडीCoronaVirus: वरळीच्या एनएससीआय क्रीडा संकुलातील कोरोना केंद्रात १५० खाटांची वाढ

CoronaVirus: वरळीच्या एनएससीआय क्रीडा संकुलातील कोरोना केंद्रात १५० खाटांची वाढ

Subscribe

वरळीतील एन. एस. सी. आय. क्रीडा संकुलात ५०० खाटांचे ‘कोरोना कोविड १९’ विलगीकरण केंद्र यापूर्वीच सुरू करण्यात आले असून आता या ठिकाणी आणखी १५० खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे. यामुळे आता या विलगीकरण केंद्राची क्षमता तब्बल ६५० खाटांची झाली आहे. तसेच या व्यतिरिक्त ४० खाटांची क्षमता असणारा कोरोना समर्पित अतिदक्षता कक्ष (कोरोना आयसीयू) देखील या ठिकाणी लवकरच सुरू करण्यात येत आहे. या अनुषंगाने महाराष्ट्र राज्याचे पर्यावरण व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री अस्लम शेख, महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी आज या परिसराची पाहणी केली.

वरळी परिसरातील एन. एस. सी. आय. लगत असणाऱ्या ‘रेस कोर्स’ परिसरात ‘कोविड कोरोना १९’ समर्पित विलगीकरण केंद्र उभारण्यात येत आहे. यासंबंधीची कार्यवाही आता अंतिम टप्प्यात आहेत. या अनुषंगाने दोन्ही पालकमंत्र्यांसह महापालिका आयुक्तांनी बुधवारी ‘रेस कोर्स’ परिसरात सुरू असलेल्या कामांची पाहणी केली. ही कामे आता अंतिम टप्प्यात असून लवकरच हे केंद्र देखील नागरिकांच्या सेवेत रुजू होईल, असा विश्वास याप्रसंगी महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांनी मान्यवरांकडे व्यक्त केला.

- Advertisement -

वरळी परिसरातील विलगीकरण केंद्रांच्या पाहणीनंतर त्या सर्वांनी वांद्रे-कुर्ला संकुल परिसरातील मैदानात मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाद्वारे (एमएमआरडीए) उभारण्यात येत असलेल्या विलगीकरण केंद्राची देखील पाहणी केली. या पाहणी दौऱ्यादरम्यान मुंबई महानगरपालिकेचे वरिष्ठ अधिकारी, संबंधित सहाय्यक आयुक्त तसेच संबंधित वैद्यकीय अधिकारी व आरोग्य अधिकारी उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -