Thursday, July 22, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर ताज्या घडामोडी मनसेला धक्का, आदित्य शिरोडकरांनी बांधले शिवबंधन

मनसेला धक्का, आदित्य शिरोडकरांनी बांधले शिवबंधन

मनसे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष, सरचिटणीस आदित्य शिरोडकर यांचा शिवसेनेत प्रवेश

Related Story

- Advertisement -

मुंबईत मनसेला मोठा धक्का बसला आहे. मनसे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष, सरचिटणीस आदित्य शिरोडकर यांनी शिवसेनेत  प्रवेश केला आहे. (Aditya Shirodkar join Shiv Sena)  शिवसेना प्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते त्यांनी शिवबंधन बांधून शिवसेनेत जाहीर प्रवेश केला असून या कार्यक्रमाला पर्यावरण मंत्री आणि आदित्य ठाकरे आणि युवा सेना सचिव वरुण सरदेसाई देखील उपस्थित होते.

- Advertisement -

 

आदित्य शिरोडकर हे मनसेच्या विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष होते. त्यांची मुंबईतील युवक संघटनेवर जबरदस्त पकड होती. मात्र आता त्यांनी मनसे पक्ष सोडून शिवसेने प्रवेश घेतल्याने मनसेला मुंबईत मोठा झटका बसला आहे. आदित्य शिरोडकर यांचा शिवसेनेच प्रवेश झाल्याने याचा शिवसेनेला मोठा फायदा होण्याची शक्यता आहे.


- Advertisement -

हेही वाचा – आमचा कोणावरही संशय नाही, पूजा चव्हाणच्या पालकांनी नोंदवला जबाब

- Advertisement -